know about some amazing amusement park in Gurugram Marathi article 
टूरिझम

गुरुग्राममधील अ‍ॅम्युझमेंट पार्कमध्ये कुटुंबासोबत करा मजा, हे आहेत उपलब्ध पर्याय

सकाळ डिजिटल टीम

पुणे : आठवडाभर काम  केल्यानंतर शरीरीसोबतच तुमचे मन देखील थकलेले असते, मग असावेळी तुम्हाला ब्रेक घेण्याची आवश्यक असते. अशा वेळी तुम्ही कुटुंबासह  कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. विकेंडचे दोन संपुर्ण दिवस वेळ नसेल तर काही तासांमध्ये देखील तुम्ही काही ठिकाणांना भेट देऊ शकता. 

अशाच एखाद्या  सुट्टीच्या दिवशी तुम्हा गुरुग्रामधील अम्युजमेंट पार्कला भेट देऊ शकता. मित्र, कुटुंब आणि प्रियजनांसह दर्जेदार वेळ घालविण्यासाठी हे पार्क एक चांगली जागा आहेत.  येथे तुम्हाला थ्रिलिंग राइड्स, अ‍ॅडव्हेंचर गेम्स, डिजिटल गेमिंग कन्सोल आणि इतर बर्‍याच गोष्टींचा आनंद घेता येईल. आज आपण अशाच काही पार्कबद्दल जाणून घेणार आहोत. 

अप्पू घर
आप्पू घर हे हरियाणामधील गुरुग्राममधील एक सुंदर वॉटर पार्क आहे, हा पार्क दहा लाख चौरस फूट भागात पसरलेले आहे. यामध्ये सुमारे 15 पाण्याच्या राईड्स आणि सुमारे 2000 पर्यटकांच्या खाण्यापीण्याची सोय आहे. हा वॉटर पार्क  2014 मध्ये सुरु करण्यात आला होता, या ठिकाणी तुम्ही  स्काय फॉल, वेव्ह पूल, क्रेझी रिव्हर, रॅपिड रेसर यासारख्या राईड्सचा आनंद घेऊ शकता.

32 वां माईलस्टोन

गुरुग्रामच्या सेक्टर १५ मध्ये स्थित, ३२ वां माईलस्टोन हा वॉटरपार्क देखील चांगला ऑप्शन आहे. तुम्ही साहसी स्वभावाचे असल्यास तुम्ही या  उद्यानास नक्कीच भेट दिली पाहिजे. येथे आपल्याला बंजी-जंपिंग, बुल राइडिंग, डिस्कोथेक, गो-कार्टिंग इत्यादी मनोरंजक खेळ खेळता येतील. या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आपणास घरगुती आणि आंतरराष्ट्रीय जेवणाची चव देखील घ्यायला मिळेल. अशाप्रकारे, या उद्यानात तुम्ही आपल्याला कुटूंबासह दर्जेदार वेळ घालविणे तसेच तुमच्या जिभेचे लाड देखील पुरवु शकता. 

अपनोघर रिसॉर्ट वॉटर पार्क

अपनोघर रिसॉर्ट वॉटर पार्क हे गुरुग्राममधील लहान मुलांपासून वडीलधाऱ्यांसाठी एक आवडते हँगआउट ठिकाण आहे . गुरुग्रामच्या सेक्टर ७७ मध्ये असलेल्या या वॉटर पार्कमध्ये तुम्हाला भूल भुलैया, जेट प्लेन, फ्लाइंग डिश आणि इतर अनेक एक्टिवीटी करण्याची संधी मिळेल. येथे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी काहीतरी नक्कीच उबलब्ध आहे. या वॉटर पार्कमध्ये येणार्‍या लोकांना तिकिटामध्येच खाण्याची सुविधा देखील दिली जाते, परंतु हे आपण घेतलेल्या पॅकेजवर अवलंबून असेल. अशा प्रकारे आपल्याला अन्नावर स्वतंत्रपणे खर्च करण्याची आवश्यकता नाही.

फन एन फूड व्हिलेज

फन एन फूड व्हिलेज हे गुरुग्राममधील एक उत्तम वॉटर पार्क आहे. फन एन फूड व्हिलेज ही अशी जागा आहे जिथे दिल्ली-एनसीआरमध्ये राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीने एकदा भेट दिलीच पाहिजे. यामध्ये वॉटर-थीम असलेल्या स्लाइड्सचा सर्वात मोठा संग्रह आहे आणि म्हणूनच हे पार्क इतर सर्व पार्कपेक्षा अगदी वेगळे आहे. येथे आपल्याला वेव्ह पूल, फॅमिली स्लाइड, टॉरनाडो एक्वा शूट, ट्विस्टर, मल्टीलाइन स्लाइड आणि स्पीड कोस्टर सारख्या बर्‍याच स्लाइड्स आणि पूल सापडतील. हे कौटुंबिक किंवा कॉर्पोरेट आउटिंगसाठी एक आदर्श आकर्षण आहे.

ऑयस्टर बीच वॉटर पार्क 

ऑयस्टर बीच वॉटर पार्क हे वॉटर-थीम असलेले पार्क आहे, ज्यात अनेक राइड्स, स्लाइड्स आणि पूल आहेत, ज्यात थंडरस्ट्रॉम, पायरट स्टेशन, टॉरपेडो, रॅपिड रेसर, क्रूझर, लेझी रिव्हर आणि रेन डान्स यांचा समावेश आहे. हे फॅमिली आउटिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे, म्हणून आपण सुट्टीच्या दिवशी कुटुंबासमवेत इथे छान वेळ घालवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Election : माजी नगरसेवकांनी शड्डू ठोकल्याने चुरस; मतांची गोळाबेरीज करण्याचे आव्हान, मताधिक्य कोणाला याचीच उत्सुकता

Pune Crime:'तरुणीशी मैत्रीच्या संबंधातून कात्रजजवळ तरुणाचा खून'; प्रेमाच्या नात्यातून मैत्रीचा बेरंग, नेमकं काय घडलं?

Long Weekend ला निघालात? सातारा–पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; खेड–शिवापूर टोलनाक्यावर काय स्थिती?

Kolhapur Accident News : राबणाऱ्या हातांवर काळाचा घाला, कोल्हापुरातील आजऱ्याजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; एक महिला गंभीर

Indian nationals arrested USA: अमेरिकेत ३० भारतीय नागरिकांना अटक, व्यावसायिक ट्रक चालवताना पकडले; कोणता गुन्हा?

SCROLL FOR NEXT