know some different Holi celebrations in India Marathi Article article
know some different Holi celebrations in India Marathi Article article 
टूरिझम

भारतातील या शहरांमध्ये होळी साजरी होते वेगळ्याच थाटात, जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

होळीच्या उत्सवाला अजून काही दिवस शिल्लक आहेत. भारतातील प्रत्येक भागात होळीचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना सकाळपासूनच होळीच्या शुभेच्छा देतात, दुपारी रंग खेळतात आणि संध्याकाळी पुन्हा एकमेकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थांचा आस्वाद घेतात. होळीचा जण वेगवेगळ्या  ठिकाणी वेगवेगळ्या पद्दतीने साजरा केला जातो. देशातील प्रत्येक शहराची होळी साजरी करण्याची वेगळी अशी तऱ्हा आहे. 

भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे होळीचे एक वेगळेच रूप तुम्हाला पाहायला मिळेल. खास या सणाचा आनंद घेण्यासाठी स्थानिक आणि परदेशी पर्यटकही या ठिकाणांना भेट देतात. आज आपण भारतातील अशाच भन्नाट ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या ठिकाणी तुम्ही देखील होळीचा पुरेपुर आनंद घेऊ शकाल.

हम्पी

असे म्हणतात की दक्षिण भारतात होळीचा सण जास्त उत्साहात साजरा केला जात नाही. पण, कर्नाटकचे हंपी शहर एक अशी जागा आहे जिथे होळी अगदी वेगळ्या शैलीत दिसते. होळीचा सण येथे दोन दिवस साजरा केला जातो. होळीच्या दिवसाची सुरुवात रंगांनी केली जाते आणि सर्व लोक तुंगभद्र नदी इतर उपनद्यांमध्ये आंघोळ करतात. ढोल-नगाड्यांच्या तालावर रस्त्यावर एकमेकांना रंग लावला जातो. होळीच्या दिवशी बरेच परदेशी पर्यटकही येथे येतात.

पंजाब 

होलीचा सण भारताच्या पंजाब शहरात अगदी वेगळ्या ढंगात साजरा केला जातो. पंजाबमधील  होळीला होला मोहल्ला नामा म्हणून ओळखले जाते. पंजाबच्या आनंदपूर साहिबमध्ये होला मोहल्ला आयोजित केला जातो. या प्रसंगी तलवारबाजी , घोडेस्वारी करणे इत्यादी गोष्टी येथे आयोजित केल्या जातात. या दिवशी लंगरमध्ये हलवा, गुजिया आणि मालपुआ देखील लोकांना देण्यात येतो.  येथे 6 दिवस होळी साजरी केली जाते. 

गोवा 

गोव्यातही होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होतो. असे म्हणतात की होळी शिमागो-उत्सव म्हणून ओळखली जाते आणि होळीच्या दिवशी येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो.  गोव्यातील होळीच्या शेवटच्या दिवशी गोव्यातील सर्व समुद्रकिनारे रंगांनी सजलेले असतात. ज्यात देशातील तसेच परदेशी पर्यटक होळी खेळायला येतात. वास्को, मडगाव यासारख्या ठिकाणी यापासून वेगळ्या प्रकारची होळी पाहायला मिळते. 

मणिपूर 

उत्तर-भारत आणि दक्षिण भारतात ज्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो त्यापेक्षा भारताच्या नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये होळीचे एक वेगळेच रूप दिसते. मणिपूरमधील होळी योसांग उत्सव म्हणून ओळखली जाते आणि हा उत्सव पाच दिवस चालतो . या पाच दिवसांत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमआयोजित केले जातात. होळीच्या एक दिवस अगोदर येथील स्थानिक लोक व मुले घरोघरी जाऊन पैसे गोळा करतात आणि होळीच्या दिवशी या पैशात बॅण्ड-बाजा लावून होळी साजरी केली जाते. 

त्याचप्रमाणे मथुराच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये देखील होळीच्या वेगवेगळ्या पध्दती दिसतात. जर तुम्हाला खरोखर होळीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही मथुरासह भारतातील यापैकी कुठल्याही ठिकाणी जाऊ शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT