Kolhapur Rain Update Rautwadi Waterfall esakal
टूरिझम

पर्यटकांसाठी खुशखबर! सह्याद्रीच्या डोंगर रांगेवरून कोसळणारा 'हा' फेमस धबधबा पर्यटनासाठी खुला; पण..

अत्यंत सुरक्षित आणि सहकुटुंब पाहता येण्यासारखा धबधबा म्हणून राऊतवाडीला पर्यटकांची पसंती

सकाळ डिजिटल टीम

राधानगरीच्या धरणाच्या डाव्या बाजूच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेवरून कोसळणारा हा जलप्रपात म्हणजे प्रत्येक पावसाळ्याची वर्षा सहल.

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : पावसाने उसंत घेतल्याने राऊतवाडीचा धबधबा (Rautwadi Waterfall) पर्यटकांना (Tourists) आजपासून पाहता येणार आहे; मात्र ज्या दिवशी रेड किंवा ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा धबधब्यावर जायला बंदी असणार आहे.

पावसाळी पर्यटनासाठी अत्यंत सुरक्षित आणि सहकुटुंब पाहता येण्यासारखा धबधबा म्हणून राऊतवाडीला पर्यटकांनी पसंती दिली आहे. अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात पर्यटक इकडे येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनाही यावर आधारित हंगामी छोटे-मोठे उद्योग करता येत आहेत.

राधानगरीच्या धरणाच्या डाव्या बाजूच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेवरून कोसळणारा हा जलप्रपात म्हणजे प्रत्येक पावसाळ्याची वर्षा सहल. यंदा पावसाने सुरुवात केल्यानंतर धबधबा प्रवाहित होताच पर्यटकांची रीघ याकडे लागली. जेमतेम आठ दिवसच हा धबधबा पर्यटकांना अनुभवता आला. त्यानंतर मुसळधार पावसाने सुरुवात केली आणि धबधब्याने उग्र रूप धारण केले.

प्रवाह इतका मोठा होता की, कड्या कपाऱ्यातून दगड त्याच्याबरोबर वाहून येत होते आणि जलस्त्रोत वेगाने तलावाकडे धावत होता. अशा परिस्थितीत एखादा पर्यटक प्रवाहात वाहू नये किंवा अघटीत घडू नये या कारणास्तव येथील प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली होती. कालपासून संथगतीने राऊतवाडीचा धबधबा कोसळतो आहे. यामुळे पर्यटकांना तो आजपासून खुला केला आहे.

मोठ्या प्रमाणात पाऊस आणि धबधब्याने उग्ररूप धारण केल्यामुळे पर्यटकांना येथे बंदी घालण्यात आली होती. आता पावसाने उसंत घेतल्याने धबधबा पर्यटकांना पाहता येणार आहे; मात्र वाकीच्या तोरस्करवाडीचा धबधबा ३१ ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहील.

- अनिता देशमुख, तहसीलदार, राधानगरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT