Lakshadweep Island esakal
टूरिझम

Lakshadweep Island : लक्षद्वीपच्या 36 बेटांपैकी 17 बेटांवर घातली बंदी; प्रशासनानं दिलं 'हे' महत्वाचं कारण

दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी बेटांवर प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी बेटांवर प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

लक्षद्वीप प्रशासनानं (Lakshadweep Administration) गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा (National security) आणि सार्वजनिक सुरक्षेच्या कारणास्तव एकूण 36 बेटांपैकी 17 बेटांवर प्रवेश करण्यास मनाई केलीये.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक

ही 17 बेटं निर्जन (Lakshadweep Island) स्थळी असून त्यांना भेट देण्यासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची (SDM) परवानगी आवश्यक आहे. लक्षद्वीपच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी (DM) फौजदारी संहिता (CrPC) च्या कलम 144 अंतर्गत या संदर्भात औपचारिक अधिसूचना जारी केलीये. दहशतवादी किंवा तस्करीच्या कारवाया रोखण्यासाठी बुधवारी या बेटांवर प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला.

लेखी परवानगीशिवाय प्रवेशावर बंदी

बेटांवर समाजकंटक आणि देशद्रोही कृत्यांमध्ये गुंतलेले लोक असू शकतात, त्यामुळं हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं. प्रशासनानं आपल्या आदेशात म्हटलंय, बेटांवर तस्करी, शस्त्रं किंवा अंमली पदार्थ लपवणं यासारखे प्रकार घडू शकतात. शिवाय, दहशतवादी संघटना देशातील महत्त्वाच्या संस्था आणि गर्दीच्या ठिकाणांवर हल्ला करून नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळं लक्षद्वीपच्या 17 निर्जन बेटांवर पूर्व लेखी परवानगीशिवाय प्रवेशावर बंदी घालणं योग्य वाटतं, असं नमूद करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump New Tariffs : ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब; भारतासह १६ देश अमेरिकेच्या निशाण्यावर, व्यापार कराराला धक्का बसण्याची शक्यता

Vijay Government Takes Action: विजय सरकारची आमदाराविरुद्ध कारवाई; महिला जिल्हाधिकाऱ्यांना अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी गुन्हा

Maharashtra Education News: मोठा निर्णय! आता ‘खासगी’ शाळांमध्ये लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश; खासगी शाळांची थांबणार मनमानी; प्रवेशासाठी वयोमर्यादाही निश्चित

Latest Marathi News Live Update : अंबाबाई मंदिरात सजला दीपोत्सव

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची आणखी दोन स्थानके आजपासून प्रवाशांसाठी खुली, प्रवाशांसाठी मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT