Saint Changdev Maharaj Tempal 
टूरिझम

संत चांगदेव मंदिर; नौकाविहार अन् अमाप उत्साह

चांगदेव मंदिर एक उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. येथे संत चांगदेवांनी चौदाशे वर्षे तपश्चर्या केल्याने हा परिसर भक्तिमय आहे.

संदीप शिंपी



चांगदेव (ता. मुक्ताईनगर) : संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात (Maharashtra)आपल्या योगसाधना व तपोबलात अग्रगण्य गणले जाणारे संत चांगदेव महाराज (Saint Changdev Maharaj) यांची तपोभूमी असलेले श्रीक्षेत्र चांगदेव येथील सिद्धेश्वर संत चांगदेव मंदिर (Tempal) ७ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी खुले होत असल्याने भाविकांसह पर्यटकांमध्ये (Tourists) आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

Saint Changdev Maharaj Tempal

मंदिराचा आहेत..रंजक इतिहास

खानदेशातील पुरातन देवस्थानांपैकी हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. हे मंदिर हेमाडपंती असून, सहा महिन्यांच्या असलेल्या एकाच रात्रीत एकाच दगडात बांधलेले असल्याची आख्यायिका आहे. मंदिराचे बांधकाम दगडी स्वरूपात आहे. मंदिराच्या चारही बाजूने विविध प्रकारच्या देवदेवतांच्या मूर्ती व आकर्षक कलाकृती केलेली आहे. हे मंदिर एक उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. येथे संत चांगदेवांनी चौदाशे वर्षे तपश्चर्या केल्याने हा परिसर भक्तिमय आहे. हे मंदिर तापी-पूर्णा नद्यांच्या संगमतीरी असल्याने पर्यटकांना व भाविकांना मंदिरासह परिसराचे आकर्षण आहे.

दोन वर्षापासून यात्रोत्सव बंद
मंदिर दीड ते दोन वर्षांपासून बंद होते. त्यामुळे मंदिरासह त्यावर अवलंबून असलेल्या साऱ्या घटकांची आर्थिक कोंडी झालेली आहे. येथे बाराही महिने धार्मिक कार्यक्रम व उत्सव साजरे केले जातात. त्यात सर्वांत मोठा महाशिवरात्रीच्या पर्वावर होत असलेला सिद्धेश्वर चांगदेव महाराजांचा भव्य यात्रोत्सव असतो; परंतु दोन वर्षांपासून येथील यात्रोत्सव व इतर कार्यक्रम व उत्सव न झाल्याने परिसरात आर्थिक सावट पसरलेले दिसून येते.

Saint Changdev Maharaj Tempal

भाविकांमध्ये उत्साह..

दीड ते दोन वर्षांपासून मंदिर जरी बंद असले तरीसुद्धा बंद दाराआड रोज पूजेची परंपरा पुजारी वर्गाने त्रिकाल त्रिसंध्या पूजाअर्चा करून अबाधित ठेवली आहे. या पूजाअर्चेचा लाभ दोन वर्षांपासून भाविकांना घेता येत नसल्यामुळे आता मंदिर खुले होत असल्याने भाविकांना पूजेचा लाभ घेता येणार असल्याने चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. सरकारने घालून दिलेले नियम व अटीनुसार भाविकांना सिद्धेश्वर संत चांगदेवांचे दर्शन व पूजा नियम पाळून घेता येणार असल्याने उत्साह निर्माण झाला आहे.

Changdev River sangam


अथांग जलाशयाची भुरळ
सिद्धेश्वर संत चांगदेव महाराजांचे मंदिर तापी-पूर्णा नद्यांच्या संगमतीरी असल्याने भाविक व पर्यटक येथे स्नान व संगमदर्शन केल्याशिवाय जात नाहीत. या संगमतीरी नानाविध धार्मिक विधी बाराही महिने होत असतात. अस्थिविसर्जनासह कालसर्प, नारायण नागबली, त्रिपिंडी, दशपिंडी विधी चालू असतात; परंतु या कोरोना संसर्गामुळे ते विधी बंद होते. ते आता पूर्ववत सुरू होणार आहे.

Changdev River Boting


नौकाविहाराचा आनंद
येथे नौकाविहार करण्यासाठी बाराही महिने पंचवीस ते तीस नौका सज्ज असतात; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नौकाविहार बंद असल्याने नौकाचालकांची आर्थिक कोंडी होत होती;. परंतु आता ७ ऑक्टोबरपासून मंदिरे खुली होत असल्याने नौकाविहार व्यवसायाला सुगीचे दिवस येऊन चालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच पक्षी निरीक्षक, पूजेचे साहित्याचे स्टॉलधारक आदींची मांदियाळी राहणार असून, रेस्टाॕरंटधारकांच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarfaraz Khan Century: कसोटी संघातून वगळले, त्या सर्फराजने खणखणीत शतक झळकावून निवड समितीला उत्तर दिले

Nashik Water Supply : इंदिरानगरची पाण्याची समस्या सुटणार; जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची परवानगी

मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीब शेतकऱ्यांचं जेवण... विवेक अग्निहोत्रीच्या वक्तव्यावर भडकले नेटकरी; म्हणतात- या गाढवाला...

Stock Market Closing: सेन्सेक्स 676 अंकांच्या वाढीसह बंद; ऑटो, रिअल्टी आणि मेटल क्षेत्रात जोरदार खरेदी

Nashik Air Pollution : नाशिकमध्ये वाहनांचा धूर जीवघेणा; प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT