टूरिझम

उत्तर प्रदेशातील महोबाशहर आहे या ठिकाणांसाठी प्रसिध्द

भूषण श्रीखंडे

जळगावः दिल्लीच्या जवळ उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) राज्य असून या राज्यात अनेक सुंदर पर्यटन स्थळ (Tourist Destination) आहे. यात बुंदेलखंड प्रदेशात (Bundelkhand Region) महोबा शहर असून याला इतिहास असून सुंदर तलाव, मंदिर, धार्मिक स्थळ देखील आहे. चला जाणून घेवू महोबा शहरा बद्दल..

महोबाचा इतिहास

महोबा शहर बुंदेलखंड तसेच उत्तर प्रदेशातील इतिहासीक महत्वाचे आहे. सुमारे 10 व्या शतकापासून ते 16 व्या पर्यंत महोबा शहरावर चंदेला शासकांचे राज्य होते. येथे भारतात प्रसिद्ध असलेले खजुराहो, प्राचीन लेणी आणि शिल्पे देखील खूप प्रसिद्ध आहेत.

शिव तांडव मंदिर

शिव तांडव मंदिर हे खूप प्राचीन मंदिर असल्याचे म्हतले जाते. या मंदिराचे मुख्य आकर्षण ग्रॅनाइट दगडाने बनवलेली तांडव नृत्य सादर करणारी भगवान शिव यांची मूर्ती आहे. ही 10 भुजा असलेली एक विशाल आणि अद्भुत मूर्ती आहे, जे पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी लोक दूरदूरवरून येथे येत असतात.

जैन तीर्थक्षेत्रे

उत्तर प्रदेशात जैन धर्मासाठी अनेक स्थळ आहे. त्यात महोबा येथील एका टेकडीवर जैन तीर्थंकर स्थळावर जैन धर्माच्या 24 तीर्थंकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मात्र, सध्या काही लेणी लोकांसाठी बंद आहेत. येथे दरवर्षी जैन बांधव या स्थळांना मोठ्या संख्येने भेट देत असतात.

मदन सागर तलाव

महोबा मधील सर्वात लोकप्रिय ठिकाण मदन सागर तलाव आहे. या तलावाच्या भवती प्राचीन मंदिरे आणि स्मारके आहेत. चंदेला शासकांचे अनेक प्राचीन राजवाडे देखील या तलावाच्या शेजारी आहेत. हा तलाव मदन वर्मा चंदेल यांनी 1129 मध्ये त्यांच्या नावाने बांधला होता आणि नंतर ते या नावावे ओळखू लागले. हे ठिकाण सहलीसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.

अन्य ठिकाणांची माहिती..

महोबा शहराजवळ गोरखगिरी पर्वत, मोहबा किल्ला आणि विजय सागर पक्षी हे ठिकाणे पर्यटांके खास आवडीचे ठिकाण आहेत. येथे तुम्ही नक्की जावू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT