टूरिझम

New Year Celebration : न्यू इयर दणक्यात सेलिब्रेट करायचे असेल तर आजच दिल्लीची ट्रेन पकडा!

दिल्लीपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी नवीन वर्ष होईल दणक्यात साजरे

सकाळ डिजिटल टीम

जर तुमचा हा दिवस फक्त ऑफिस आणि घरातील कामांमध्ये जात असेल. त्याने तूम्ही अगदी कंटाळला असाल तर  वर्षाच्या अखेरीस तुम्हाला मोकळा वेळ मिळणे हा तूमचा हक्क आहे. वर्षाचा शेवट गोड आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी लोक अनेक ठिकाणी ट्रिपचे प्लॅन करतात. वर्षभराचे दु:ख, टेंशन बाजूला ठेऊन लोक एन्जॉय करतात.

नवीन वर्षात प्रवास करायचा असेल दिल्ली दूर नही है, असेच म्हणावे लागेल. कारण, खरंच वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी दिल्लीतील काही ठिकाणांशिवाय बेस्ट पर्याय नाही. दिल्ली ते नोएडा प्रवासाचे नियोजन करणेही खूप सोपे आहे. कारण आज तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात जे दिल्लीपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहेत. जिथे तुम्ही तुमचे नवीन वर्ष साजरे करू शकता.

नैनिताल

नवीन वर्षात तुम्ही नैनितालला भेट देण्यासाठी जाऊ शकता. येथे जाण्यासाठी तुम्ही गाडीने किंवा ट्रेनने जाऊ शकता. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये नैनिताल खूपच नयनरम्य नजारे अनुभवायला मिळतात. येथे अनेक कॅफे, हॉटेल्स आणि होमस्टे आहेत. जिथे तुम्ही राहून येथील सौंदर्याचा लाभ घेऊ शकता.

राजस्थान

जर तुम्ही राजस्थानला गेला नसेल तर तुम्ही तुमच्या नवीन वर्षात तिथे भेट देऊ शकता. येथे जयपूर, उदयपूर ही सर्वात सुंदर शहरे आहेत. नवीन वर्षात नवीन उत्साह देणारी हि रंगीबेरंगी शहरं पाहणे आपल्यासाठी खूप मनोरंजक असेल.

तुम्ही दिल्लीहून राजस्थानला ५ तासांपेक्षा कमी वेळात आरामात पोहोचू शकता. इथे गेल्यावर तुमचे मन या ठिकाणच्या रंगात पूर्णपणे रंगून जाईल. इथल्या लोकसंगीताला आणि खाद्यपदार्थाला पर्याय नाही. येथून तुम्ही अप्रतिम बांधणी साड्या आणि दुपट्ट्यांची खरेदी करू शकता. तसेच इथे आलात तर भव्य किल्ले पाहायला विसरू नका.

मुक्तेश्वर

तुमचे नवीन वर्ष येथे साजरे केले तर तुम्ही आयुष्यभर येथील सुंदर क्षण विसरू शकणार नाही. दिल्लीपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर मुक्तेश्वर हे अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. भीमतालच्या आजूबाजूला पडणाऱ्या या शहराचे सौंदर्य तुम्हाला नवी उर्जा देईल. या काळात हिमालयाच्या पर्वतरांगा बर्फाच्छादीत झालेल्या असतात. त्यांचे सौंदर्य पाहण्यासारखे असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT