Best Places to Visit in the Monsoon
Best Places to Visit in the Monsoon  sakal
टूरिझम

पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यायचायं? 'या' ठिकाणी भेट द्या

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात महाराष्ट्र फिरायची ईच्छा असले तर येथे जाऊन तुम्ही मनमुरादपणे आनंद घेऊ शकता

आता पावसाळा तोंडावर आला आहे. तुम्हाला जर का पावसाळा आवडत असले आणि पावसाळ्यात महाराष्ट्रात फिरायची ईच्छा असले तर आम्ही तुम्हाला काही ठिकाणे सांगतो तिथं जाऊन तुम्ही मनमुरादपणे पाऊसाचा आनंद घेऊ शकता. सोबतच तेथील हिरवा शालु पांघरलेल्या निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा अनुभव शकता. चला तर मग बघु या कोणती सात ठिकाण आहे तिथं पावसाळ्यात जाता येत. (Best Places to Visit in Monsoon)

भंडारदरा -

पावसाळ्यात दोन दिवसांचा ट्रीपकरता जाण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे अगदी योग्य ठिकाण आहे. पावसाळा सुरु की इथे काजवा मोहोत्सव भरतो. निसर्ग सौंदर्याने नटलेले हे स्थान, इथले धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा जागेच्या मूळ सौंदर्यात अजूनच भर टाकतात.

भीमाशंकर -

पुण्यातील जिल्ह्यात असणारे भीमाशंकर हे घनदाट अरण्यानं असलेलं समृध्द ठिकाण आहे. भीमा नदीचा उगमही याच अरण्यातून होतो. हे ठिकाण उंचावर असल्याने पावसाळ्यात अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे सौंदर्य निसर्गाने इथे उधळलेले असते. येथील गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. फक्त इथं जातांना सोबत आपली छत्री किंवा रेनकोट घेऊन जा. कारण इथे सतत पाऊस पडत असतो.

समुद्र किनारे -

दापोली, दिवेआगर, वेळास हे महाराष्ट्रातील काही निसर्गरम्य, निवांत असणारे, स्वच्छ आणि कमी गर्दी असणारे समुद्रकिनारे आहेत. पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. ही तीनही ठिकाणे कोकणात असल्याने या ठिकाणी जायचा रस्तादेखील पावसाळ्यात तितकाच नयनरम्य असतो.

चिखलदरा -

सातपुडा पर्वतरांगेत तब्बल एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. खोल दऱ्या, धबधबे, दूरवर पसरलेले हिरवे गालिचे, धुक्याची दुलई असे चित्र इथे पावसाळ्यात पाहायला मिळते. तुम्हाला भटकंतीसाठी देवी पॉईट, पंचबोल पॉईट. वॉटर बोटींग व दुचाकीवरून मस्त फिरण्यासाठी भीम कुंड, वन उद्यान, या परिसरातील लोकांनी तयार केलेल्या वस्तूंचे संग्रहालय ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. येथून जवळच एक किल्ला सुध्दा आहे.

इगतपुरी -

हे ठिकाण समुद्रसपाटीपासून उंच असल्याने इथे वर्षभर थंडगार वातावरण असते. अस म्हणतात की इगतपुरी तालुक्याला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. भरपूर वनसंपदा आणि जलसंपदा असल्याने निसर्गाचे वेगवेगळे अंग अगदी जवळून अनुभवायला मिळतो. भातसा नदीचे पात्र, आर्थर लेक, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, त्रिनगलवाडी फोर्ट, थाल घाट, म्यानमार गेट, भावली डॅम, अशोका फॉल्स, घाटनदेवी माता मंदिर ही ठिकाणे इगतपुरीचे आकर्षण आहेत.

माळशेज घाट -

नगर-कल्याण रस्त्यावरील माळशेज घाट हा मुसळधार पावसात भिजण्यासाठीचे अप्रतिम ठिकाण आहे. अगदी हात उंचावला तर हातात ढग येण्याची शक्यता या घाटात दिसते. या घाटातून दूरवर पसरलेल्या दऱ्यांचा नजरा पाहणे काही औरच. म्हणूनच फोटोग्राफर्स लोकांची ही अतिशय आवडती जागा आहे. माळशेजघाटा आधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे, जवळच हरिश्चंद्र गडही आहे.

सांधण व्हॅली

उंच डोंगरकडे आणि खोल दऱ्या ह्यांनी वेढलेला पुण्यापासून जवळ आसलेला सांधण व्हॅली चा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात येथे अनेक रौद्र धबधबे दिसतात.तो धबधब्याचा आवाज,आजुबाजूची हिरवळ आणि सगळ्यात महत्त्वाचा पाऊस हे सगळं एकत्र अनुभवता येतं.

(टिप-पावसाळ्यात प्रवास करतांना फक्त थोडी काळजी घ्यावी महापुर, दरड कोसळणे अशा घटना घडु शकतात. म्हणून जिवावर बेतेल अस धाडस करु नये.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT