Mastani Lake Enhanced with Monsoon Rains esakal
टूरिझम

Pune Tourism : श्रावणसरींनी खुलले ‘मस्तानी’चे सौंदर्य! दृश्य अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमींची गर्दी; परिसरात उत्साहाचे वातावरण

Shravan Rains enhance tourist spots in Maharashtra : श्रावणसरींनी मस्तानी तलावाचे सौंदर्य खुलवले असून, निसर्गप्रेमींची गर्दी परिसरात उत्साह निर्माण करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Rainy day picnic spots in Pune: सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि सैन्यदल यांची अभेद्य तटबंदीमुळे पुणे सुरक्षित मानले जाते. याच पर्वतरांगेतील शहराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर असणारा दिवे घाट निसर्ग सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक मस्तानी तलावासाठी प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात दिवेघाटाचे सौंदर्य खुलत असते. सध्या सुरू असलेल्या श्रावण सरींनी येथील डोंगराचे चित्र बदलत आहे.

वर्षभर रुक्ष दिसणारा डोंगराला आता पालवी फुटू लागली आहे. डोंगराने हिरवे रूप धारण केले आहे. जवळच असणारे कानिफनाथ मंदिर आणि मस्तानी तलाव निसर्गप्रेमीला साद घालत आहे.

येथील मस्तानी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. पेशवेकालीन परंपरा असणारा हा तलाव १४ एकरांमध्ये आपले अस्तित्व आजही टिकवून आहे. तीन बाजूंनी डोंगर आणि मधोमध असणारा तलाव जणू मौल्यवान दागिन्यातील हिरा असल्याचे भासत आहे. नागरिक घाट माथ्यावरून निसर्गाचे हे सुंदर व मनमोहक रूप मोबाईलमध्ये टिपत आहेत.

सध्या नागरिकांची पावले डोंगरमाथ्याकडे वळू लागली आहेत. येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मस्तानी तलाव क्षणभर येथे थांबण्यास भाग पाडत आहे. येथे येऊन प्रवाशांची पावले आपोआप थांबत आहेत, तर वाहनांचा वेग मंदावत आहे.

बसमधून का होईना, येथे आल्यावर सर्वांच्या नजरा या तलावाकडे वळत आहेत. सुट्टीच्या दिवशी तलाव जवळून पाहण्यासाठी मुलांना घेऊन नागरिक येत असल्याचे दिसत आहे. पाणवठ्यावर येणारे निरनिराळे पक्षी लहान मुलांना आकर्षित करत आहेत. मोराचा आवाज येणाऱ्या बाजूने फोटो काढण्यासाठी मुलांचे मोबाईल आपोआप वळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emotional Raksha Bandhan: जी बहीण आता या जगात नाही, तिच्या हातांनी भावाला राखी बांधली!

Indian Railway: भारतीय रेल्वेकडून जपानमध्ये १० दिवसांची सफर, कधीपासून होणार सुरू? पहा बुकिंग प्रकिया आणि किंमत

Student End Life Kolhapur : नववीच्या मुलीला असलं काय टेन्शन आलं, राहत्या घरात घेतला गळफास अन्...

ZIM vs NZ 2nd Test: न्यूझीलंडच्या ९५ वर्षांच्या कसोटी इतिहासात प्रथमच असे घडले! १९८६ मध्ये भारतीयांनी केला होता असा पराक्रम...

Shiv Sena : महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा असेल, उदय सामंताचे कोल्हापुरात कोणाला आव्हान

SCROLL FOR NEXT