Sex Tourism  esakal
टूरिझम

Sex Tourism : पर्यटनाचा नवा पॅटर्न; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘सेक्स टुरीझम’चा बाजार!

पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून लोकांनी शोधली नवी ट्रिक

सकाळ डिजिटल टीम

पर्यटकांनी आपल्या देशात यावे, देशातील निसर्ग सौंदर्य पहावे यासाठीच्या अनेक जाहीराती तूम्ही पाहिल्या असतील. त्यात त्या देशातील प्रसिद्ध गोष्टी दाखवल्या जातात. हे आजवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केलं जातं. पण जगात असा एक देश आहे ज्याने पर्यटकांना आकर्षित करण्याचा नवा पॅटर्न शोधला आहे.

आफ्रिकन देश गांबियामध्ये सध्या सेक्स टुरिझमचा व्यवसाय फोफावत आहे. पर्यटक अधिक यावेत यासाठी आफ्रिकन मुलांना सेक्स करण्यासाठी ठेवले जाते. युरोपातील वृद्ध स्त्रिया वयाच्या 60 वर्षापासून येथे हजेरी लावत आहेत.

गांबिया आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. हा प्रकार येथे मध्यंतरी पहायला मिळत आहे. गांबियन अधिकाऱ्यांना हे थांबवायचे आहे. त्यावर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. त्यांच्या मते, अल्पवयीन तरूण मुलांना अडकवल्याने येथील कुटुंबे विस्कळीत होत आहेत.

गांबियात विदेशी पर्यटकांची गर्दी

एका रिपोर्टनूसार, देशात फोफावणारा हा सेक्सचा ट्रेंड तिथल्या नागरिकांसाठी डोकेदूखी बनला आहे. तिथल्या सरकारलाही तो बंद करायचा आहे. पण, या जाहीरातबाजीमूळे तिथे ब्रिटीश गोऱ्या महिलांचा ओढा वाढला आहे.

डार्टफोर्ड येथील ६५ वर्षाच्या बार्बरा म्हणाल्या की, 'मला सेक्सच आकर्षण आहे. मला यात काही गैर वाटत नाही. तसेच, मी काहीही बेकायदेशीर करत नाही. थायलंडमध्ये तुम्हाला अनेक तरुण मुली आढळतील ज्यांना वृद्ध पुरुषांसोबत राहतात. त्यावर कोणी काही बोलत नाही, पण गांबियातील प्रकारावर सगळे तोंडसुख घेतात.

पोरांना पगार दिला जातो का?

गांबियातील स्थानिक तरूणांना या कामासाठी महिन्याला 18 हजार पगार आहे. तर, तिथल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ ५ हजार पगार मिळतो. त्या तूलनेच एक पुरुष सेक्स वर्कर एका आठवड्यात 45-50 हजार रुपये कमवू शकतो.

या देशाकडे वयस्कर महिलांचा ओढा

तिथे येणाऱ्या पर्यटक महिला तरूण पोरांसोबत फिरतात, त्यांच्या सोबत राहण्याचा खाण्याचा खर्च उचलतात. पण त्या त्यांना पैसे देत नाहीत. या भेटी दरम्यान काही लोक एकमेकांच्या प्रेमातही पडतात.

आमचा देश गरीब आहे. त्यामूळे आम्हाला जगण्यासाठी पैसा लागतो. इथे लोकांकडे पैसे नाहीत. जर एखादी ब्रिटीश महिलेला मी आवडलो तर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मी तिच्यासोबत काही वेळ एकत्र घालवू शकतो, असे गांबियामध्ये राहणाऱ्या २० वर्षाच्या ओलूने स्पष्ट केले.

समोर आलेली स्त्री, तिच वय काय आहे हे आमच्यासाठी महत्त्वाच नाही. तुम्ही एखाद्या श्रीमंत गोर्‍या स्त्रीसोबत असाल तर लोकांना तूमचं अप्रूप वाटेल, असेही तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

Satara Crime: आरफळच्या युवकाचा खून; सातारा तालुक्यात उडाली खळबळ, नवरा-बायकाे शेतामध्ये काम करत अन् अचानक काय घडलं!

SCROLL FOR NEXT