New Year 2024 esakal
टूरिझम

New Year 2024 : गोव्यातील ‘या’ सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर साजरा करा नवीन वर्षाचा आनंद

नव्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी तुम्ही गोव्याचा विचार नक्कीच करू शकता. तेथील सुंदर बीचेस, पब्स, आणि प्रेक्षणीय पर्यटन स्थळे फिरण्यासाठी गोवा एकदम बेस्ट ऑप्शन आहे.

Monika Lonkar –Kumbhar

New Year 2024 : आपण सर्वजण आता २०२३ च्या अखेरच्या टप्प्यात आहोत. लवकरच आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. नव्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक जण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. जर तुम्ही शिमला, मनाली आणि इतर पहाडी प्रदेशांमध्ये जाऊन कंटाळला असाल तर गोवा तुमच्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे.

खास करून थंडीच्या दिवसांमध्ये आणि न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी गोवा एकदम परफेक्ट आहे. गोव्यातील सुंदर बीचेस, तेथील पब्स, पार्टीची ठिकाणे आणि प्रेक्षणीय पर्यटन स्थळे फिरण्यासाठी आणि न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे.

आज आपण गोव्यातील सुंदर बीचेसबद्दल जाणून घेणार आहोत, जी न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत.

बटरफ्लाय बीच

गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा म्हणून बटरफ्लाय बीचची खास ओळख आहे. गोव्यात सध्या काही निवडक व्हाईट सॅंडचे (पांढरी वाळू) बीचेस राहिले आहेत. त्यापैकी हे एक बीच आहे. हा समुद्रकिनारा आणि पांढरी वाळू आणि नारळाची झाडे यामुळे, येथे एक वेगळाच नजारा पहायला मिळतो.

Butterfly Beach

या बटरफ्लाय बीचवर जाण्यासाठी तुम्हाला बोटची मदत घ्यावी लागेल. त्यानंतर, तुम्ही जंगलातून ट्रेकिंग करून या ठिकाणी पोहचू शकता. येथे जवळपास काही रिसॉर्ट्स देखील आहेत. मात्र, ते या बीचपासून काही थोड्या अंतरावर आहेत.

वागातोर बीच

उत्तर गोव्यातील मापुसा रोडजवळ हे वागातोर बीच आहे. या बीचवर तुम्ही न्यू इयर पार्टीचा प्लॅन करू शकता. येथे तुम्ही नाईट पार्टी आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकता.

Vagator beach

विशेष म्हणजे गोव्यातील इतर बीचेसच्या तुलनेत या बीचवर तुम्हाला थोडी कमी गर्दी पहायला मिळेल. त्यामुळे, जर तुम्हाला गर्दीचे ठिकाण टाळायचे असेल आणि थोडा निवांतपणा हवा असेल तर हे बीच तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

अरंबोल बीच

गोव्यामध्ये फिरण्यासाठी अनेक सुमद्रकिनारे आहेत. यातील काही ठिकाणे ही पार्टीसाठी आणि नाईटलाईफसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, गोव्यातील हे बीच मजा-मस्ती आणि तेथील सुंदर नजाऱ्यांसाठी अधिक प्रसिद्ध आहे.

Arambol Beach

न्यू इयर पार्टीसाठी हे ठिकाण एकदम बेस्ट आहे. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मित्र-मंडळींसोबत येथे नाईट पार्टीचा ही आनंद घेऊ शकता. येथे परवडणाऱ्या किंमतीमध्ये तुम्ही स्वादिष्ट भोजनाचा आणि बोट राईडचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT