Andaman Travel  esakal
टूरिझम

Andaman Travel : अंदमानला फिरायला जायचय? मग, तिथे गेल्यावर 'या' गोष्टी करायला विसरू नका

हिवाळा सुरू झाला की, अनेक जण फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात. कपल्स असो किंवा फॅमिलीसोबत फिरायला जायचे असेल तर लोक या थंडीच्या दिवसांमध्ये फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात.

Monika Lonkar –Kumbhar

Andaman Travel : हिवाळा सुरू झाला की, अनेक जण फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात. कपल्स असो किंवा फॅमिलीसोबत फिरायला जायचे असेल तरी अनेक जण या थंडीच्या दिवसांमध्ये जाण्याचे प्लॅनिंग करतात. खास करून डिसेंबर ते मार्च या दरम्यान विविध ठिकाणी फिरायला जाण्यावर अनेक जण भर देतात.

अवघ्या काही दिवसांवर ‘व्हॅलेंटाईन डे’ येऊन ठेपला आहे. जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. त्यापूर्वी, आठवडाभर व्हॅलेंटाईन वीक सगळीकडे साजरा केला जातो. यंदाच्या व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत अंदमानला फिरायला जाणार असाल तर तिथे गेल्यावर तुम्ही काही गोष्टी एक्सप्लोअर करायलाच हव्यात. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

स्कूबा डायव्हिंग करा

अंदमानमधील सुंदर समुद्रकिनारे, तिथला निसर्ग आपल्या सर्वांना नेहमीच भुरळ घालतो. अंदमानमधील या स्वच्छ आणि निळ्याशार समुद्रकिनाऱ्यांवर गेल्यावर स्कूबा डायव्हिंग करायलाच हवे.

अंदमानच्या समुद्रकिनाऱ्यांवर गेल्यावर तुमच्या जोडीदारासोबत स्कूबा डायव्हिंग करण्यात एक वेगळीच मजा आहे. पाण्याखालचे वेगळेच जग तुम्ही अनुभवाल आणि हा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय असेल, यात काही शंका नाही. येथे गेल्यावर तुम्ही स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंगचा कोर्स ही करू शकता.

समुद्रकिनाऱ्यांवर घालवा वेळ

अंदमानमध्ये गेल्यावर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत क्वालिटी टाईम घालवायचा असेल तर तिथल्या समुद्रकिनाऱ्यांवर मस्त फेरफटका मारा. पार्टनरच्या हातात हात देऊन समुद्रकिनाऱ्यावर चालण्याची मजा काही औरच आहे. खास करून सूर्यास्त किंवा सूर्योदयावेळी तुम्ही बीचेसवर वेळ अवश्य घालवा.

यामुळे, तुमच्यातील नाते आणखी बहरेल आणि समुद्रकिनाऱ्यावर रेतीतून आणि पाण्यातून चालताना एक वेगळाच आनंद तुम्हाला मिळू शकेल. त्यामुळे, अंदमानमध्ये गेल्यावर ही गोष्ट करायला अजिबात विसरू नका.

वॉटर स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटी

समुद्रकिनाऱ्यांवर गेल्यावर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेणे गरजेचे आहे. यामध्ये एक वेगळीच मजा असते. अंदमानमध्ये गेल्यावर स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, जेट स्किईंग, सर्फिंग, बनाना बोट राईड, पॅरासिलिंग इत्यादी अनेक प्रकारच्या वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. या सर्व अ‍ॅक्टिव्हिटीज एंजॉय करा आणि तुमची ही अंदमान ट्रीप अविस्मरणीय करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : पोर्टलवर खताचा साठा भरपूर, पण तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संकटात

Samsung Discount Offer : चक्क 24 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट; सॅमसंगच्या 'या' प्रीमियम स्मार्टफोनवर बंपर सूट

Ind-US ट्रे़ड डील फायनल होणार? डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर, परराष्ट्र मंत्र्यालयाने नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT