athirapalli 
टूरिझम

कोरोनानंतर फिरायला जायचा विचार करताय? तर बाहूबलीमधला 'अथिरापल्ली धबधबा' आहे उत्तम पर्याय

सकाळ ऑनलाईन टीम

कोची: अनेक बॉलिवूड आणि तमिळ चित्रपटांमध्ये तुम्ही अथिरापल्ली धबधबा पाहिला असेल. त्यातल्या त्यात बाहूबली या चित्रपटात हा धबधबा अगदी जवळून दाखविला गेला आहे. याअदगोदरही अनेक चित्रपटांत अथिरापल्लीचा धबधबा दाखवला गेला आहे. यामध्ये गुरु, पुकार चित्रपटांतली शूटींगमध्येही हा धबधबा पाहायला मिळतो. 

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रसारामुळे लोकं बाहेर फिरायला जायची कमी झाली आहेत. जसजशी परिस्थिती निवळत आहे तसं लोकं बाहेर फिरायला जाताना दिसत आहेत. जर तुम्हीही कुठंतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर अथिरापल्ली धबधबा उत्तम पर्याय आहे, चला तर जाणून घेऊया अथिरापल्ली धबधब्याविषयी अधिकची माहिती.

केरळ हे तिथल्या सुंदर निसर्गासाठी जगभरात प्रसिध्द आहे. प्रत्येक सिजनमध्ये तिथला निसर्ग पर्यटकांना खूनावत असतो. इथं अनेक पवित्र स्थळेही आहेत. यासाठीही मोठ्या प्रमाणात पर्यटक केरळमध्ये येत असतात. केरळच्या कोची शहरापासून जवळपास 75 किलोमीटरवर अथिरापल्ली नावाचा प्रसिध्द धबधबा आहे. तुम्ही कोचीहून अथिरापल्लीला जाऊ शकता. इथंच बाहूबली चित्रपटाची शुटींग झाली होती. या धबधब्यावरून तुम्हाला सुंदर निसर्गाचे दर्शन होईल.

इथेच पर्यटाकांना शोलायर डोंगरांचा निसर्गही पाहता येऊ शकतो. थोडं चालत गेलं की तुम्ही धबधब्याच्या खाली जाऊ शकता. या धबधब्यापासून 7 किलोमीटरवरच वेझाचल धबधबा आहे. इथून चालक्कुडि नदीही जाते, जी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. या धबधब्याच्या आसपासच सुंदर वने असून तिथ वन्य प्राण्यांचाही अधिवास आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT