California Toursit Places  
टूरिझम

वाईन प्रेमींसाठी सर्वोत्तम पर्यटनस्थळ, एकदा भेट द्याच

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - किती रोमांटिक की तुम्ही द्राक्षेच्या बागेत हातात वाईनचा ग्लास घेऊन मधोमध बसला आहात. अमेरिकेत जगातील अनेक मोहक आणि सुंदर द्राक्षांच्या बागा आहेत.

यामुळे यास रोमांटिक डेस्टिनेशनही म्हटले जाऊ शकते. या रोमांटिक डेस्टिनेशनवर जरुर जावे. तर चला त्याविषयी जाणून घेऊ या..

कॅलिफोर्निया
कॅलिफोर्नियात अनेक प्रकारच्या वाईन मिळतात. हा जगातील चौथा सर्वात मोठे वाईन उत्पादन होते. अमेरिकेच्या 90 टक्के वाईनची येथेच निर्मिती केली जाते. वाईन प्रेमींसाठी हे सर्वेात्तम ठिकाण आहे. जिथे तुम्ही अप्रतिम वाईनचा आस्वादाचा आनंद घेऊ शकता.

गोल्डन स्टेट - नापा व्हॅली आणि सोनोमा काऊंटी दोन जगप्रसिद्ध वाईनचे क्षेत्र आहेत. सॅनफ्रँसिस्कोच्या उत्तरी भागातील अर्धातासाच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी वाहनाने जाऊ शकता. सिल्वराडो ट्रायलने तुम्ही येथे येऊ शकता. जे की नापा व्हॅली वाईन रुट आहे. हा रस्ता चहूबाजूंनी सुंदर अशा द्राक्षांच्या बागांनी वेढलेले आहे. सिल्वराडो ट्रायलचे प्रतिष्ठित द्राक्षाच्या बागेत जोसेफ फेल्प्स, जेड्डी वाईन आणि मायनल फॅमिली वाईनरीचाही समावेश होतो. सोनामा काऊंटीत 18 अमेरिकन व्हर्टीकल्चर क्षेत्र आहे. जिथे 425 पेक्षा अधिक वाईनरीज आहेत. 60 पेक्षा अधिक द्राक्षांच्या प्रजातीपासून वाईन बनवले जाते. पायनट नोयर, चारडोन्ने, जिनफेंडल, केबरनेट साॅव्हिगनाॅन आणि साॅविगनाॅन ब्लॅक हे वाईनचे सर्वोत्तम प्रकार मिळतात. तुम्हा सिएराच्या पर्वतांमधील गोल्ड कंट्रीलाही भेट देऊ शकता. हे जुने जिनफेंडल ग्रेपवाईन कॅलिफोर्नियाच्या उत्तर पूर्वी भागात मिळते. येथे 1850 च्या दशकापासून वाईनचे उत्पादन केले जाते. आज गोल्ड कंट्रीला वाईनरीज,वाईनटूर, टेस्टिंग रुम आणि रेस्तराँसाठीही ओळखले जाते. कॅलिफोर्नियाच्या इतर वाईन क्षेत्रात मेंडोकिनो काऊंटी,सेंट यनेज, सेंट बारबरा आणि टेमेकुला आदींचा समावेश होतो.

व्हर्जिनिया    
व्हर्जिनिया वाईनप्रेमींसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे 300 पेक्षा अधिक वाईनरीज आणि डझनभर वाईन ट्रायल आहे. जे सुंदर असा निसर्गाच्या वैविध्याने नटलेले, छोटे पण आकर्षक शहरे आणि ऐतिहासिक स्थळांनी वेढलेले आहे. उत्तरी व्हर्जिनिया, अमेरिकेची राजधानी वाॅशिंग्टन डीसीचे खूप जवळ आहे. जे ब्लू रिज पर्वत आणि पोटोमॅक नदी, लाऊडाऊन काऊंटीच्या मधोमध वसलेले आहे. येथे डोंगरांच्या मध्ये 40 पेक्षा अधिक वाईनरीज आणि टेस्टिंग रुम आहेत. येथील प्रसिद्ध लोकप्रिय वाईनरीजमध्ये ब्रेऑक्स वाईनयाड् र्स, क्रिसेलिस वाईनयाडर्स,  स्टोन टाॅवर वाईनरी आणि ग्रीनहिल वाईनरीत वाईनयाडर्सचा समावेश आहे. शेनाडोआह व्हॅली, पूर्व अमेरिकेत अमेरिक व्हिटिकल्चर क्षेत्र (एव्हीए) आहे. जे व्हर्जिनियाच्या पश्चिम किनाऱ्याला कव्हर करुन पूर्व किनाऱ्यापर्यंत जाते. मध्य व्हर्जिनियाचा विचार केला

तर चारलोटेविले मॅान्टिसेलो वाईनट्रायलचे सुरूवातीचे ठिकाण आहे. येथून तुम्ही या प्रदेशातील सर्वांत मोठ्या वाईनरीजपर्यंत जाऊ शकता. जेफरसन वाईनयाऊर आणि बारबोर्सविले वाईनयार्ड क्षेत्राच्या दोन वाईनयार्ड आहे.

ऑरेगाॅन
विलामेट्टे व्हॅली ऑरेगाॅनचे प्रमुख वाईन क्षेत्र आहे. जे सर्वोत्तम असा पायनट नोयर वाईनसाठी जगभरात ओळखले जाते. वेळ काढून ऑरेगाॅनच्या सर्वांत मोठ्या वाईन क्षेत्रा एकदा जाऊन या. या स्थळ तुमच्या आठवणीत राहिल. येथे तुम्हाला सुंदर वाईनयार्ड आणि फार्म पाहायला मिळेल. स्थानिक शेतकरी मोठ्या उत्साहाने चांगल्या द्राक्षांचे उत्पादन घेतात. यासाठी तुम्ही द्राक्षा बागेमध्ये बसून जगप्रसिद्ध पायनट नोयरचा आनंद घेऊ शकता.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT