Goa hidden places
Goa hidden places Esakal
टूरिझम

Goa Hidden Places: गोव्यातील hidden ठिकाणांना नक्की भेट द्या

Kirti Wadkar

Goa hidden places: गोवा हे देशातील येथील लोकप्रिय असा पर्यटन स्थळ आहे गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती सुंदर समुद्रकिनारी Sea Shore नारळाची आणि पोफळीची झाडं आणि तिथलं नाईटलाइफ.

हे महाराष्ट्राला लागूनच असलेलं राज्य असल्याने महाराष्ट्रातल्या Maharashtra मोठ्या संख्येने लोक तिथे पर्यटनासाठी जात असतात. Tourism Tips in Marathi Know about unknown places if Goa

गोव्यातील समुद्र किनारे तिथे असलेले शक नारळाच्या बागा आकर्षक रचना असलेले चर्च Church हे पर्यटकांना भुरळ घालतात. गोव्यातील Goa काही लोकप्रिय स्थळे वगळता इतरही अशी अनेक सुंदर आणि निसर्गरम्य स्थळे Tourists आहेत ज्यांच्याकडे पर्यटकांकडून दुर्लक्ष केलं जातं. 

गोव्यातील पालोलेम बीच, अगोंडा बीच, बेनौलिम बीच तसंच बागा बीच कलंगुट बीच हे लोकप्रिय समुद्रकिनारे आहेत याशिवाय आग्वाद किल्ला, बेसिलिका ऑफ बोम जिझस म्युझियम, ओल्ड गोवा ही काही आकर्षणाची स्थळ आहेत.

मात्र या व्यतिरिक्त ही गोव्यामध्ये अशी काही खास ठिकाण आहेत याबद्दल अनेक पर्यटकांना कल्पना नाही. ज्यांना गोव्यामध्ये रिलॅक्स होण्यासाठी जायचंय ते या स्थळांना नक्कीच भेट देऊ शकतात ही स्थळ निसर्ग रम्य आणि मनाला शांती देणारी आहेत.

चोरला घाट- गोव्यातील चोरला घाट हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हे ठिकाण असून फार कमी पर्यटकांना या ठिकाणीच माहिची आहे. तुम्हाला जर शहरातील गोंधळ किंवा गोव्यातील गर्दीने भरलेल्या समुद्र किनाऱ्यांएवजी शांत आणि तितक्याच सुंदर अशा वातावरणात वेळ घालवायचा असेल तर चोरला घाट इथं नक्की भेट द्या. 

Goa Chorla Ghat Tourism

नेत्रावली वन्यजीव अभयारण्य- दक्षिण गोव्यामध्ये असलेलं नैत्रावली वन्यजीव अभयारण्य हे गोव्यातील एक नयनरम्य ठिकाण आहे. विविध वनस्पती आणि वन्यजीन या अभयारण्यात आढळतात. जर तुम्ही प्राणी प्रेमी किंवा निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण नक्कीच तुम्हाला भुरळ घालेल. 

हे देखिल वाचा-

अर्वलेम धबधबा- गोव्यातील संकेलिम या एका सुंदर गावामध्ये असलेला अर्वलेम धबधबा डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे.

५० फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा, धबधब्याच्या परिसरातील हिरवाई डोळ्यांना शांती देणारी ठरते. इथल्या शांत वातावरणात खळखळून वाहणारं धबधब्याचं पाणी आणि निसर्गरम्या वातावरण तुम्हाला रिफ्रेश करेल. 

Goa Arvalem Waterfall Photo

दिवार बेट- गोव्यामध्ये अनेक छोटी छोटी बेट लपलेली आहे. या बेटांचं सौदर्य भुरळ घालणारं आहे. यापैकीच एक म्हणजे दीवार द्वीप. मंडोवी नदीवर असलेलं हे द्वीप ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे सुंदर ठिकाण आहे. इथली हिरवळ, तसचं पोर्तुगाली वास्तूकला  पाहण्यासारखी आहे. इथं इतरही सुंदर वास्तूकला तुम्ही पाहू शकता. 

बटरफ्लाय आयलॅण्ड- पालोलेम बीचवरून एका छोट्या बोटीने तुम्ही काही मिनिटांमध्ये हे बेट गाठू शकता. इथं पोहचण्यासाठीचा बोटीच्या प्रवासाची तुम्ही मजा लूटू शकता. अत्यंत शांत असं हे एक बेट आहे. 

Goa Butterfly Island Photos

एल्डोना गाव- एल्डोना गाव हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात सुंदर गावांपैकी एक गाव आहे. गोव्यातील या टुमदार सुंदर गावाला एकदा तरी नक्की भेट द्या. म्हापसा नदीच्या काठावर वसलेलं या गावाची रचना अतिशय सुंदर आहे. इथलं सेंट थॉमस चर्च आणि काही पोर्तुगीज वास्तुकला पाहण्यासारख्या आहे. 

Aldona goan goa

याचसोबतच केवळ एका दिवसात भेट देता येईल अशा पारा रोडच्या राईडचा आनंद तुम्ही घेऊ शकता. या रोडच्या शेजारील हिरवळ आणि नारळाची झालं हे फोटोसेशनसाठी किंवा व्हिडीओग्राफीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. तसचं तुम्ही हाउस ऑफ गोवा म्युझियमला देखील एक फेरफटका नक्की मारु शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT