Travel Diaries  esakal
टूरिझम

Travel Diaries : आहाहा! काय नजारा... आयुष्यात एकदा तरी हा उलटा धबधबा बघा, सहलीची मज्जा होईल डबल

सडा वाघापूर अन्‌ "रिव्हर्स पॉईंट' अर्थातच उलटा धबधबा हे समीकरण अलिकडील काळात दृढ बनले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Travel Diaries : पर्यटन प्रेमींमध्ये कायमच काहीतरी नवीन बघण्याची क्रेज दिसून येते. रिव्हर्स वॉटरफॉलबाबत तुम्ही ऐकलंच असेल. मात्र त्याची मज्ज कधी जवळून अनुभवलीत काय? सडा वाघापूर अन्‌ "रिव्हर्स पॉईंट' अर्थातच उलटा धबधबा हे समीकरण अलिकडील काळात दृढ बनले आहे. आज आपण या ठिकाणाबाबत सविस्तर जाणून घेऊया.

इथली मजा अनुभवण्यासाठी, जलतुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटक बहुसंख्येने इथे भेट देताना दिसतात. निसर्गाचे आगळे काैतुक म्हणजे सडा वाघापूर येथील "रिव्हर्स पॉईंट'. कड्यावरून खाली उतरणारे पाणी वायुवेगाने पुन्हा वर येते. वाऱ्याच्या प्रचंड दाबामुळे सुमारे 100 फुटांपर्यंत ते उलटे पठारावर फेकले जाते. त्यातून तयार होणारे पाण्याचे कारंजे चिंब करतात. उलट्या धबधब्याचा हा आविष्कार पूर्णतः वाऱ्याच्या दाबावर अवलंबून आहे. वाऱ्याचा दाब अधिक असल्यास अतिशय मोहक व डोळ्यांचे पारणे फेडणारा असा नजारा दृष्टीस पडतो.

येथील तारळे गावाला ऐतिहासिक संदर्भ आहेत शिवरायांच्या कन्या अंबिकाबाई या येथील राजे महाडिक घराण्याच्या सूनबाई. गावात काही जुने वाडेही पहावयास मिळतात. या पावसाळ्याच्या हंगामात भेट देणे कधीही चांगले. धबधबा पाहताना अबालवृद्ध, महिला यांची काळजी घ्यावी. पावसाळ्यात परिसर निसरडा असतो. (Amazing Tourist Places)

सध्या उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाऊसाचेच वातावरण दिसून येते. तेव्हा तुम्हाला एखाद्या विकेंडला अशा थ्रिलींग ठिकाणाचा अनुभव घ्यायचा असेल तर सडा वाघापूरचा हा रिव्हर्स पॉइंट अतिशय बेस्ट ठिकाण ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT