Must Visit Shiva Temples During Shravan Somwar 2025 in Pune Sakal
टूरिझम

Shravan 2025: मनातल्या इच्छा राहिल्यात अपूर्ण? श्रावणी सोमवारी पुण्याच्या 'या' जागृत मंदिरांना द्या भेट!

Shravan 2025 Pune Shiva Temples to Fulfill Wishes: जर तुमच्याही मनात अशी कोणती इच्छा असेल जी पूर्ण होत नाहीये तर तुम्ही पुण्याजवळच्या या मंदिरा...

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील शिव मंदिरात शिवलिंग पूजा करून मनोकामना पूर्ण करा.

प्राचीन नागेश्वर मंदिरात बेलपत्र अर्पण करून आध्यात्मिक शांती आणि यश मिळवा.

शिव मंदिरात ध्यान आणि पूजा करून इच्छा सिद्ध करा.

Must Visit Shiva temples in Pune on Shravan Somwar 2025: असं म्हणतात श्रावण महिन्यात महादेवांकडे मागितलेली कोणतीही इच्छा पूर्ण होते, महादेव तसेही आपल्या भक्तांना नेहमीच खूप सुखी ठेवतात. जर तुमच्याही मनात अशी कोणती इच्छा असेल जी पूर्ण होत नाहीये तर तुम्ही पुण्याजवळच्या या मंदिरांना भेट देऊ शकतात.

सोमेश्वर मंदिर, बाणेर (Someshwar Temple, Baner)

Jagrut Lord Shiva Temple in Pune

आत्ता जरी पुणे महानगरपालिकेने इथल्या नदीला नाला म्हणून घोषित केलेल असलं तरी त्या काळी मुळा नदीची उपनदी राम नदीच्या काठी हे मंदिर वसलेल आहे. मंदिराच्या परिसरात गणपती, हनुमान आणि भैरवनाथ यांची लहान मंदिरं आहेत. मंदिराच्या उत्तरेला हवनकुंड आहे. आणि मंदीराच्या प्रवेशद्वारावर ४० फूट दीपमाळ आहे. मंदिर परिसराला आजूबाजूला दगडी तटबंदी आहे. भिंतीच्या एका भागात एक छोटी गॅलरी बांधण्यात आली आहे, ज्यात मोडी लिपीतील जुनी कागदं, चित्रे आणि काही फोटो यांच छोटसं प्रदर्शन आहे.

बनेश्वर मंदिर (Baneshwar Temple)

Jagrut Lord Shiva Temple in Pune

बनेश्वर हे पुण्याच्या नैऋत्येस सुमारे ३६ किमी अंतरावर नरसापूर गावात जंगलाच्या मधोमध स्थित असलेले शिवाचे मंदिर आहे. बनेश्वर मंदिराची वास्तू मध्ययुगीन काळातील आहे. नानासाहेब पेशवे यांनी १७४९ मध्ये हे मंदिर बांधले होते. मंदिरात एक महत्त्वाची घंटा आहे जी चिमाजी अप्पांनी १७३९ मध्ये बॅसिएनच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर ताब्यात घेतली होती. याच प्रकारची आणखी ४ पोर्तुगीज घंटा भीमाशंकर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर- पुणे, शिव मंदिर (मेनावली-वाई) आणि रामलिंग मंदिर (शिरूर) इथेही आढळतात.

नीलकंठेश्वर मंदिर (Neelkantheshwar Temple)

Jagrut Lord Shiva Temple in Pune

निळकंठेश्वर मंदिर पार्किंगपासून १ किमीचा छोटा ट्रेक आहे. माथ्यावर पोहोचायला ४०-६० मिनिटं लागतात. मुख्य प्रवेशद्वारावर दोन मोठ्या मूर्त्या आहेत. झोपलेल्या अवस्थेत भगवान बजरंग बलीची एक मोठी मूर्ती. मुख्य मंदिर मोठ्या जागेत पसरलेले आहे. आत गेल्यावर एक मोठा हॉल आहे. त्यानंतर त्याला लागून आणखी एक सभामंडप आहे ज्यात मुख्य शिवलिंग मंदिर आहे.

भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple)

Jagrut Lord Shiva Temple in Pune

भीमाशंकर पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योर्तिलिंग आहे. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

पुण्यातील कोणत्या जागृत मंदिरांना श्रावण 2025 मध्ये भेट द्यावी?

ओंकारेश्वर, नागेश्वर, पाताळेश्वर आणि सोमेश्वर ही पुण्यातील जागृत शिवमंदिरे आहेत, जिथे भेट देऊन मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

श्रावणात या मंदिरांना भेट देण्याचे विशेष महत्त्व काय आहे?

श्रावणात शिवपूजा आणि जलाभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, ज्यामुळे इच्छा पूर्ण होण्यास आणि आध्यात्मिक उन्नतीस मदत होते.

  1. श्रावणात शिवपूजा आणि जलाभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, ज्यामुळे इच्छा पूर्ण होण्यास आणि आध्यात्मिक उन्नतीस मदत होते.

ओंकारेश्वर मंदिराची खासियत काय आहे?

पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिर हे शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे, जिथे तांदूळ आणि बेलपत्र अर्पण केल्याने समृद्धी प्राप्त होते.

पाताळेश्वर मंदिरात कोणत्या पूजा कराव्यात?

पाताळेश्वर मंदिरात शिवलिंगावर दूध, गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करून 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT