love temple vrindavan esakal
टूरिझम

Valentine’s Day 2025 : सिंगल पोरापोरींनो निराश होऊ नका, या मंदिरात दर्शन घेतल्यानं मिळतं प्रेम

Vrindavan's Prem Mandir: वृंदावनचे प्रेम मंदिर हे भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. हे मंदिर प्रेमाचं प्रतिक आहे.

सकाळ डिजिटल टीम

Radha Krishna Prem Mandir in Vrindavan : व्हॅलेंटाइन डेच्या औचित्यावर प्रेमी जोडी आणि पती-पत्नी ताजमहल बघायला जातात. ताजमहालला जगातलं ७ वं आश्चर्य आणि प्रेमाचं प्रतिक मानलं गेलं आहे. पण फक्त ताजमहलच नाही तर मथुरेचं वृंदावन मंदिरपण प्रेमाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. असं मानलं जातं की, या मंदिरात जोडप्यांनी दर्शन घेतलं की, मनोकामना पुर्ण होतात आणि एकमेकातलं प्रेम वाढतं.

मथुरा आणि वृंदावनात श्रीकृष्ण आणि राधेचे अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत. या मंदिरांशी इतिहास आणि पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. बऱ्याच मंदिरांची वास्तुकला अद्भूत आहे. लोकांना आकर्षित करते. या मंदिरांच्या भव्यता आणि सौंदर्यासाठी देश-विदेशातून लोक येतात.

हे मंदिर एवढं सुंदर आहे की, तुम्ही तासंन् तास त्याकडे बघत राहू शकतात. इतर दिवशीही या मंदिरात लोकांची गर्दी बघायला मिळते. पण व्हॅलेंटाइन डे ला कपल्स इथे दर्शनाला आवर्जून येतात. जाणून घेऊया या मंदिराविषयी काही रहस्यमयी गोष्टी

प्रेम मंदिराची खासियत

  • वृंदावनाचं प्रेम मंदिर श्रीकृष्ण आणि राधाला समर्पित असतं. याबरोबरच श्रीराम आणि सीता मातेलाही समर्पित आहे. मंदिराची संरचना जगद्गुरु कृपालू महाराज यांनी केले आहे. यासाठी एक हजार मजूर ११ वर्ष बनवत होते.

  • हे मंदिर बनवण्याचं काम २००१ मध्ये सुरु झालं होतं. याची उंची १२५ फूट तर १२२ फूट लांब आहे. तर रुंदी ११५ फूट आहे. यासाठीचे संगमरवर इटलीहून मागवण्यात आलं होतं.

  • इथे श्रीकृष्ण आणि राधा बरोबर श्रीराम आणि सीता यांचं मंदिर आहे. लोकांसाठी मंदिर २०१८ मध्ये खुले करण्यात आलं.

  • हे मंदिर दिवसा पांढरं तर रात्री विविध रंगांचं दिसतं. मंदिरात अशा काही प्रकारची लाइटिंग करण्यात आली आहे की, प्रत्येक ३० सेकंदाला मंदिराचा रंग बदलतो.

  • हे मंदिर मथुरा रेल्वे स्टेशनपासून साधारण १२ किलोमीटर तर एअरपोर्टपासून ५४ किलोमीटर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT