India's Greenest Cities 
टूरिझम

Greenest Cities : एकदा भेट द्यायलाच हवी अशी भारतातील सर्वात हिरवीगार शहरे

हिरव्यागार आणि निसर्गरम्य शहराच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिरव्यागार आणि निसर्गरम्य शहराच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

आपण पैशाने सर्वकाही घेऊ विकत घेऊ शकतो.पण, धकाधकीच्या कंटाळवाण्या आयुष्यात मानसिक समाधान शोधावे लागते. यामुळेच सलग सुट्टी आल्यावर लोक निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. सलग सुट्टी आल्यावर हिरवळ असलेल्या ठिकाणी पर्यटक गर्दी करताना दिसतात. तुम्हीही अशाच हिरव्यागार आणि निसर्गरम्य शहराच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज जाणून घेऊयात भारतातील ग्रीनेस्ट शहरे कोणती आहेत.

भोपाल

शहर असूनही भोपाळ हिरवळीने भरलेले आहे. ३ डिसेंबर १९८४ मध्ये झालेल्या गॅस दुर्घटनेनंतर देखिल भोपाळने देशातील सर्वात हिरव्यागार शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. पर्यावरणविषयक जागरूकता आणि नागरिकांनी शहर सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न याचे परिणाम दिसून येतात.

चंदीगढ

चंदीगढ हे भारतातील सर्वात पद्धतशीर आणि आकर्षक शहरांपैकी एक आहे. चंदीगढ पायाभूत सुविधा आणि हिरवळ यांच्यात संतुलन निर्माण करताना दिसते. चंदीगड म्हणजे एक महाकाय वृक्षच आहे. गेल्या दोन वर्षांत इथले वनक्षेत्र 4 चौरस किमीने वाढले आहे.

हैदराबाद

हैदराबाद हे आंध्र प्रदेशमधील एक शहर असून त्याला मोत्यांचे शहरही म्हटले जाते. हैदराबादला सलग दुसऱ्या वर्षी 'ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड' असे नाव दिले आहे. युनायटेड नेशन्सच्या आर्बर डे फाउंडेशन (एडीएफ) आणि अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) ने हि घोषणा केली होती. शहरातील जंगलांची काळजी घेत शहराने ही कामगिरी केली आहे.

गांधीनगर

गुजरातची राजधानी गांधीनगर असून साबरमती नदीच्या काठावर वसलेली आहे. शहरीकरणाच्या मार्गात निसर्गाला दूर न ठेवणारे हे शहर देशातील सर्वात हिरवेगार शहर आहे. शहरात सुमारे ३२ लाख झाडे असून दीड लाख लोकसंख्या आहे. याचा अर्थ गांधीनगरमध्ये प्रति व्यक्ती च्या नावे २२ झाडे आहेत.

म्हैसूर

म्हैसूर हे कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे, परंतु सर्वात हिरवेगार शहर आहे. भारतातील पहिले हिरवेगार आणि स्वच्छ शहर असल्याचे म्हटले जाते. हे शहर धबधबे, राजवाडे, बागिचे आणि मंदिरांसाठी ओळखले जाते. जंगलांना कुठेही धक्का न लागू देता शहराची निर्मीती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT