World Tour Cruise Sakal
टूरिझम

World Tour: एका तिकीटात पूर्ण होईल जग पाहण्याचं स्वप्न; ७ महाद्वीप व १४० देशांच्या प्रवासासाठी अशी करा बुकिंग

तुम्हालाही या अनोख्या प्रवासाला जायचं असेल, तर जाणून घ्या बुकिंग कसं असेल आणि भाडं काय असेल?

वैष्णवी कारंजकर

जग खूप सुंदर आहे आणि असे अनेक देश आहेत जिथे सुंदर अकल्पनीय अशी निसर्गाची रुपं पाहायला मिळतात. दरवर्षी लाखो लोक भरपूर पैसा खर्च करून या देशांना भेट देतात. तुम्हालाही जग फिरण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. पण, यासाठी तुम्हाला जास्त पैसा आणि वेळ खर्च करावा लागेल. ही जगाची सफर एका जहाजाद्वारे 1001 दिवसात पूर्ण होईल आणि तुम्ही 140 देशांना भेट द्याल.

लाइफ अॅट सी क्रूझची एमव्ही लारा क्रूझ लोकांना जगभरात एका अनोख्या प्रवासावर घेऊन जात आहे, ज्यामध्ये त्यांना पृथ्वीच्या नकाशावर उपस्थित असलेले अनेक देश पाहण्याची संधी मिळणार आहे. तुम्हालाही या अनोख्या प्रवासाला जायचं असेल, तर जाणून घ्या बुकिंग कसं असेल आणि भाडं काय असेल? (Tourism News)

लाइफ अॅट सी क्रूझचे सीईओ सांगतात की, ज्या लोकांना त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात समतोल राखायचा आहे त्यांना लक्षात घेऊन ही टूर तयार करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जे लोक रिमोट काम करत आहेत किंवा घरून काम करत आहेत ते या वर्ल्ड टूरला जाऊ शकतात. या 130,000 मैल लांबीच्या सहलीची तयारी कामासोबतच प्रवास करणाऱ्या अशा रसिकांसाठी करण्यात आली आहे.

एमव्ही लारा क्रूझ या 3 वर्षांच्या प्रवासात 7 खंडातील 140 देश आणि 382 बंदरांवर थांबेल. यादरम्यान ते चीन, रोम, भारत, उत्तर अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये जाणार आहेत. या प्रवासात लोकांना जगातली 13 आश्चर्येही पाहायला मिळणार आहेत. प्रवाशांना प्रवासात जास्त वेळ पोर्ट टाइम मिळेल आणि अशा परिस्थितीत ते प्रत्येक देशात पुरेसा वेळ घालवू शकतील.

या संपूर्ण दौऱ्यात प्रवाशांच्या खाण्यापिण्याची आणि क्रूझवर राहण्याची भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. क्रूझमध्येच जिम, पूल, स्पा, ऑडिटोरियम आणि रेस्टॉरंटची सुविधा असेल. www.lifeatseacruises.com वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या क्रूझवरील 3 वर्षांच्या प्रवासासाठी दोन लोकांसाठी, तुम्हाला प्रति वर्ष 77 हजार 026 डॉलर्स भरावे लागतील. तिकीट बुक करण्यासाठी https://www.lifeatseacruises.com ला भेट द्यावी लागेल.

भारतीय रुपयानुसार ही रक्कम ६३ लाख ७८ हजार ५२३ रुपये होते. आता या अनोख्या प्रवासाला ८५ दिवस उरले आहेत. ही क्रूझ 1 नोव्हेंबर 2023 रोजी इस्तंबूल इथून प्रवास सुरू करेल. 5 नोव्हेंबर रोजी बार्सिलोना इथून पकडता येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघाने Playing XI मध्ये काय करावा बदल? पाँटिंग, शास्त्रींनी 'त्या' एका खेळाडूचं नाव घेत स्पष्ट सांगितलं

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याने खळबळ, सिमकार्ड, पॉवर बँक, चार्जर आणि वायर जप्त

Congress vs BJP Political Clash : 'दिवा विझण्याआधी फडफडतो तशी भाजपची सध्याची अवस्था, शेवट जवळ आलाय'; डीके शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

SCROLL FOR NEXT