Viral Video Sakal
Trending News

Viral Video : 17 लाखाची नवी कार पडली बंद; गाढवाने ओढत मालकाने आणली शोरूमपर्यंत

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

उदयपूर : राजस्थानातील उदयपूर येथे एका व्यक्तीने चक्क गाढवाने ओढत महागडी कार शोरूमपर्यंत आणल्याची घटना घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून ती गाडी बिघडली असून शोरूमकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचं मालकाकडून सांगण्यात येत आहे.

प्रत्येकजण घर, गाडी यासारख्या वस्तू मोठ्या इच्छेने खरेदी करतो. राजस्थानमधील राज कुमार गायरी नावाच्या एका व्यक्तीनेही मोठ्या महत्त्वाकांक्षेने तब्बल १७ लाखांची ह्युंडाई कंपनीची कार खरेदी केली. पण त्याने खरेदी केलेली नवीन कार वारंवार बंद पडत होती. कंपनी सुद्धा योग्य सर्व्हिस देत नव्हती.

त्यामुळे कंपनीवर आपला राग काढण्यासाठी त्या व्यक्तीने एक अनोखा मार्ग शोधला. सदर व्यक्तीने त्यानंतर ही कार गाढवाने ओढत शोरूमपर्यंत नेली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून गाडीच्या बॅटरीचा प्रोब्लेम येत होता. पण शोरूमकडून आम्हाला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही थेट गाढवाला बांधून गाडी शोरूमपर्यंत नेण्याचं ठरवलं असं गाडी मालकाने सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT