Australia sakal
Trending News

Australia: लाखोंच्या नोकरीला लाथ मारत वयाच्या साठीत बनला ट्रक ड्रायव्हर... काय होतं नेमकं कारण?

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव ग्रेग रॉस आहे.

Aishwarya Musale

एका 60 वर्षीय व्यक्तीने कंपनीत सीईओ पद सोडले आणि ट्रक ड्रायव्हर झाला. जिथे लोक नोकरीच्या शोधात असतात तिथे या व्यक्तीने एवढी मोठी पोजीशन सोडून ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्या व्यक्तीने सांगितले की तो त्याच्या कामावर अजिबात समाधानी नाही. त्यांनी हा निर्णय का घेतला याचे कारण सांगितले आहे.

गार्डियनच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव ग्रेग रॉस आहे. ते एका थिएटर कंपनीचे सीईओ होते. पण वयाच्या 60 व्या वर्षी कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्यानंतर थकवा जाणवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते म्हणाले की, मला आयुष्यात मोठा बदल घडवायचा होता. त्यामुळेच नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

रॉस सांगतात की त्यांच्या मनात खूप दिवसांपासून काहीतरी चालू होतं. कामात मन लागत नव्हते. दरम्यान, मला थायरॉईड कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर 2008 मध्ये जेव्हा मी माझ्या काकांचे शेवटचे दर्शन घ्यायला गेलो तेव्हा मला वाटले की आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे आहे. जेणेकरून मन समाधानी राहावे. अशा स्थितीत त्यांनी मनाचे म्हणणे ऐकून घेण्याचे ठरवले आणि लाखो रुपये पगाराच्या नोकरीचा निरोप घेतला.

Australia

रॉसच्या मते- आयुष्यात सर्व प्रकारचे अनुभव आले. पण ट्रक चालवण्याचा अनुभव अजिबात नव्हता. अशा परिस्थितीत ट्रक कंपनी जॉईन करून ड्रायव्हिंग शिकले, समजले आणि नंतर ट्रक ड्रायव्हरचा व्यवसाय स्वीकारला.

रॉस आता ७२ वर्षांचे आहे. गेल्या 12 वर्षांपासून ते ट्रक चालवत आहेत. त्यांना अवजड वाहने चालवायला आवडतात. रॉस ट्रक चालवताना 'वॉचिंग द व्हील्स' गाणे ऐकतात. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले- आपण स्वतःला दुसरी संधी दिली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT