Marriage Sakal
Trending News

65 वर्षाच्या महापौराचे 16 वर्षीय शाळकरी मुलीशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सासूला केलं सरकारी अधिकारी | Marriage Crime

सासूसोबत सासूच्या बहिणीलाही नोकरीत बढती दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

वयोवृद्ध व्यक्तीने दुसरे लग्न केल्याच्या अनेक घटना घडत असतात. पण आपल्या वयापेक्षा तबब्ल ५० वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत लग्न केलेली घटना आपण कधी पाहिली नसेल. सध्या अशीच एक घटना समोर आली असून ब्राझीलमधील अरौकारियाच्या ६५ वर्षाच्या महापौराने १६ वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत विवाह केला आहे. हे ऐकून आपल्यालाही धक्का बसला असेल.

ब्राझीलमधील पराना राज्याच्या अरौकारियाचे महापौर असलेल्या ६५ वर्षाच्या हिसम हुसैन यांनी आपल्यापेक्षा ४९ वर्षे लहान असलेल्या कौएनी रोड कॅमार्गो हिच्याशी विवाह केला आहे. कौएनी ही हायस्कूलची विद्यार्थीनी असून ती मिस अरौकिया या सौंदर्य स्पर्धेत दुसरी आली होती. विशेष म्हणजे या विद्यार्थीनीच्या वयाचे १६ वर्षे पुर्ण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा विवाह पार पडला आहे.

दरम्यान, सदर विवाह पार पडल्यानंतर महापौराने आपल्या सासूची संस्कृती आणि पर्यटन सचिव म्हणून नियुक्ती केली. त्याचबरोबर सासूच्या बहिणीलासुद्धा नोकरीत बढती दिली. त्यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेंला उधाण आलं आहे.

१६ वर्षावरील मुले फक्त पालकांच्या संमतीने लग्न करू शकतात असा नियम असताना महापौराने काहीतरी लाच देऊन लग्न केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुलीच्या नातेवाईकांची उच्च पदावर नियक्ती करणे ही लाच असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. तर या महापौराच्या राजीनाम्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सदर महापौराचे १९८० पासून हे सातवे लग्न आहे. त्यांना एकून १६ अपत्ये असून २००० साली ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक झाली होती. नागरिकांच्या आरोपानंतर मुलीच्या आईला आणि मावशीला पदावरून हटवत चौकशीला सुरूवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT