Viral Video  esakal
Trending News

Viral Video : अरे देवा! चक्क अस्वलानेच धरलं मुलीला, शक्ती पेक्षा युक्तीने वाचवला जीव

जंगल सफारी आणि जंगली प्राण्यांविषयीचे अनेक व्हिडीओज सध्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

A Bear Attack on Girls Viral Video : सोशल मीडियावर एक ना अनेक विषयांवर व्हिडीओज व्हायरल होत असतात. काही अगदीच विनोदी असतात. तर काही व्हिडीओ काळजाचा ठाव घेतात अन् काही थेट अंगावर काटा उभा करतात. जंगल सफारी आणि जंगली प्राण्यांविषयीचे अनेक व्हिडीओज सध्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

यात एका अस्वलाने मुलींच्या एका ग्रुपवर हल्ला केला. मुली जंगली पायवाटेने जात असताना एक भला मोठा अस्वल त्यांच्या जवळ आला. तो मुलींच्या जवळ गेला. त्याने एका मुलीला धरलं, जोरात ओढलं. नंतर सोडून दिलं.

मग त्यांचा वास घेतला. त्यांना पंजे मारले. पण या वेळी मुलींनी आरडा-ओरडा न करता युक्तीने काम केलं. त्या तिथंच स्तब्ध उभ्या राहिल्या. घाबरून जाऊन पळापळ, ओरणं असं काहीही न करता संयम बाळगला. अस्वलाचं ओढणं, वास घेणं, पंजे मारणं कोणतीही हालचाल न करता सहन केलं.

तिथंच त्या स्तब्ध उभ्या राहिल्याने थोड्यावेळाने अस्वल तिथून निघून गेला. अस्वल पुढे जाताच मग मागून या मुलींनी पळ काढला. आणि शक्ती ऐवजी युक्तीचा वापर करत स्वतःचा जीव वाचवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT