Viral Video
Viral Video sakal
Trending News

बजरंगीबलीच्या भक्तीत सैराट आज्जीबाई; भजनावर केला तुफान डान्स, Video Viral

निकिता जंगले

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. रामनवमीनंतर सध्या देशभरात हनुमान जयंतीची जय्यत तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एका आजीचा हनुमानाचे भजन गीत गात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो.

हनुमान जयंती तोंडावर असताना जिकडे तिकडे हनुमानाची आराधना, पुजा, भजन किर्तन सुरू आहे. या भक्तीमय वातावरणातलाच हा व्हिडीओ दिसतोय. (a grandmother sing Hanumans bhajan song and dance video goes viral hanuman jayanti special )

व्हिडीओमध्ये एक ७५-८० वर्षाची आजी हनुमानाचं भजन गीत गाताना दिसतेय. ही आजी ज्या उत्साहाने भजन गीत गातेय, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही एनर्जेटीक व्हाल. हे भजन गाताना आजी नृत्यही करताना दिसत आहे. "हनुमान की जय.. जय जय हनुमान की जय" हे भजन गीत गात आजीने ठेका धरलाय.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजीच्या अवती भोवती भजन गीत गात असलेल्या स्त्रियांनी टाळ्यांचा ठेका धरलाय. सुंदर असा भजन गीत म्हणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

अद्याप हा व्हिडीओ कुठलाय, याची माहिती मिळाली नाही. तरीसुद्धा आजीच्या एनर्जीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून अनेक लोक हा व्हिडीओ शेअर करत आहे.

राम भक्त हनुमान यांची जयंती दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या तिथिला साजरी केली जाते. देशाच्या काही भागात अन्य तिथिंवरही हनुमान जयंती साजरी करावी लागते. पौराणिक कथेनुसार, हनुमानजी हे रुद्रावतार आहे. त्यांचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी झाला होता.

हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी 05 एप्रिल बुधवारला सकाळी 09:19 वाजता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तिथी सुरू होणार तर 06 एप्रिलच्या दिवशी गुरुवारी सकाळी 10:04 वाजता ही तिथी संपणार. अशात हनुमान जयंती 06 एप्रिल म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT