AIIMS Doctor dance eSakal
Trending News

Viral Video: टीप टीप बरसा पाणी...अन् AIIMS च्या डॉक्टरने 'खरंच' स्टेजला आग लावली; पाहा कातिल व्हिडिओ

AIIMS Doctor Viral Dance video: अनेक डॉक्टर शांत स्वभावाचे वाटतात. पण, जेव्हा संधी मिळते तेव्हा ते आपल्यातील वेगळी कला दाखवण्यात मागे राहात नाही. याची प्रचिती एक व्हिडिओ पाहून येत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- डॉक्टर म्हटलं की आपल्या समोर पांढऱ्या कपड्यातला एक गंभीर व्यक्ती येतो. रुग्णांवर उपचार करणारा आणि त्यांना बरे करणारा. अनेक डॉक्टर शांत स्वभावाचे वाटतात. पण, जेव्हा संधी मिळते तेव्हा ते आपल्यातील वेगळी कला दाखवण्यात मागे राहात नाही. याची प्रचिती एक व्हिडिओ पाहून येत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ AIIMS च्या एका महिला डॉक्टरचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला डॉक्टर 'टीप टीप बरसा पाणी' गाण्यावर अतिशय भन्नाट डान्स करताना दिसत आहे. डॉक्टर डान्समध्ये आपल्या कातिल अदा दाखवत आहे. तिच्या डान्स स्टेप अगदी परफेक्ट आहेत. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून महिला डॉक्टरवर 'प्रेमा'चा वर्षाव केला आहे.

महिला डॉक्टरने टीप टीप बरसा पाणीवरील डान्स अनेकांना भुरळ पाडत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. डॉक्टरने आपल्या डान्सने खरंच स्टेजला आग लावली अशी भावना नेटकऱ्यांमध्ये आहे. २५ सेकंदाचा हा व्हिडिओ पाहताना एकही सेकंद डोळे स्क्रिनवरून हटवू वाटत नाहीत. यावरून महिला डॉक्टरने किती चांगला डान्स केलाय हे समजून येईल.

अनिष्का सिंग यादवने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओतील डॉक्टरच्या डान्सचा व्हिडिओ पाहून अनेकजण तिचे फॅन झाले आहेत. काहीतरी कार्यक्रम सुरु असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. यात डॉक्टर डान्स करण्यास सुरुवात करते अन् सगळ्यांवर आपली जादू टाकते. सगळेजण तिचा डान्स उत्सुकतेने पाहतात. एखादी मोठी अभिनेत्री डान्स करत असल्यासारखं नेटकऱ्यांना देखील वाटतं.

महिला डॉक्टरला तिचे सहकारी प्रोत्साहन देत असताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. टाळ्या शिट्ट्या वाजवून डॉक्टरला दाद दिली जाते. नेटकरीही महिला डॉक्टरच्या प्रेमात पडले आहे. डॉक्टरने आता अभिनेत्री व्हावं असा सल्ला तिला दिला जात आहे. दरम्यान, व्हिडिओ AIIMS च्या डॉक्टरचा असल्याची पुष्टी 'सकाळ माध्यम' करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT