Trending News

Video: सर्वांना वाचवू शकत नाही! अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला अश्रू अनावर; गाझातील व्हिडिओ व्हायरल

हमास अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर इस्राइलनं गाझा पट्टीत केलेल्या प्रतिहल्ल्यात अनेक लहान मुलांसह नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

गाझा : पॅलेस्टाईनमधील हमास या अतिरेक्यांनी इस्रायलमध्ये केलेल्या भीषण ड्रोन हल्ल्यांमुळं सर्वत्र हाहाकार माजला आहे. याला प्रत्युत्तर देताना इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात अनेक लहान मुलं आणि नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. याची भीषणता दर्शवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. एका अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरचा हतबल झालेला हा व्हिडिओ असून यामध्ये त्याला अश्रू अनावर झाले आहेत. (Ambulance driver breaks down in tears for not being able to save everyone Israel video goes viral)

आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इस्रायलनं केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये कुठलेही हल्ले होताना दिसत नाहीत किंवा उद्ध्वस्त झालेल्या इमारती नाहीत किंवा सैरावैरा पळतानाचे नागिरक नाहीत. (Latest Marathi News)

तर फक्त एका अॅम्ब्युलन्समध्ये ड्रायव्हर बसला असून तो रडताना दिसतो आहे. हल्ल्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे की, त्यामुळं आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. लोकांना रुग्णालयांपर्यंत नेण्यासाठी अॅम्ब्युलन्सही कमी पडत आहेत.

ड्रायव्हरला अश्रू अनावर

याच पार्श्वभूमीवर त्या सर्व लहान जखमी बालकांना आपण रुग्णालयापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. प्रत्येकाचा जीव आपण वाचवू शकत नाही, याची खंत या अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला आहे. त्यामुळं त्याला बसल्या बसल्या अश्रू अनावर झाले आहेत. हा व्हिडिओ एकूणचं इस्राइल-पॅलेस्टाईन युद्धाच्या भीषणतेची जाणीव आपल्याला करुन देतो. (Marathi Tajya Batmya)

वाद जुनाच

इस्राइल आणि पॅलेस्टाईनचा वाद जुना असून सोमवारी तो पुन्हा उफाळून आला. यामध्ये इस्राइलच्या यापूर्वीच विस्तारवादी भूमिकेमुळं आणि हल्ल्यांमुळं त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या पॅलेस्टाईनच्या हमास या बंडखोर आणि अतिरेकी संघटनेनं गाझा भागात सोमवारी 5,000 ड्रोन हल्ले केले होते. कमी वेळेत इतक्या मोठ्या प्रमाणावर हे हल्ले झाल्यानं इस्राइलचे क्षेपणास्र विरोधी 'आयरन डोम सिस्टीम' देखील फोल ठरली होती. यामध्ये सुमारे ३००० लोकांचा बळी गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT