Viral Video Sakal
Trending News

"तुमचा नशीब, कर्मावर विश्वास नसेल तर हे बघा..."; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला थरारक Video Viral

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

'आपल्या नशिबात जे आहे ते घडत असतं' असं अनेकजण बोलताना सहज बोलून जात असतात. तर काही गोष्टी अशा असतात त्या पाहून आपल्याला कर्म किंवा नशिबावर विश्वास बसत असतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एका गाडीचा अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील असून त्यामध्ये एक गाडी खांबाला येऊन धडकताना दिसत आहे. अपघात होण्याच्या काही क्षण अगोदर एक मुलगा खांबाजवळ उभा असतो. तो पुढे जाताच क्षणी गाडी येते आणि खांबाला धडकते. जर तो तीन ते चार सेकंद आहे त्या ठिकाणी थांबला असता तर तो गाडीखाली चिरडला असता.

हा व्हिडिओ पाहून आपल्याला धक्का बसेल. उद्योजक आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. "तुमचा नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर हे बघा... तुम्हालाही आश्चर्य वाटेल!" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

SCROLL FOR NEXT