anant ambani radhika merchant wedding card has a beautiful kashmiri pashmina shawl know all details  
Trending News

अनंत राधिकाच्या वेडिंग कार्डसोबत दिलेल्या पश्मिना शालची काय आहे खासीयत?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. अंबानी कुटुंबातील हे लग्न खुपच खास असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. यामागची कारणंदेखील तशीच आहेत. लग्नासाठी खास बनारसी साड्या, लाखाच वेडिंग कार्ड अन् बरचं काही...

काही दिवसांपूर्वी अनंत राधिकाच्या वेडिंग कार्डची जोरदार चर्चा रंगली. या वेडिंग कार्डसोबत अंबानी कुटुंबांनी आपल्या खास पाहुण्यांना काही भेटवस्तु दिल्या आहेत. या भेटवस्तुमध्ये काश्मिरची पश्मिना शॉलदेखील सहभागी आहे.

तर जाणुन घेऊयात या पश्मिना शॉलबद्दल

पश्मिना शालची किंमत 10 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत आहे. पश्मिना शाल केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे.

तीन बकरीच्या लोकरीपासून बनते पश्मिना शाल

च्यांगरी बकरी हिवाळ्यात शरिरावरील लोकर स्वतःहून सोडतात. त्यांच्या लोकरीचे वजन 80 ते 170 ग्रॅम पर्यंत असू शकते. पश्मिना शाल बनवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. एक शाल बनवण्यासाठी किमान तीन मेंढ्यांची लोकर लागते आणि एक आठवडा ते 10 दिवस लागतात. त्यामुळे पश्मिना शाल खूप महाग आहे.

इतिहासकारांच्या मते, काश्मीरचे १५ व्या शतकातील शासक जैनुल अबेदिन यांनी राज्यात लोकर उद्योगाची स्थापना केली आणि काश्मिरी पश्मीना शालला प्रोत्साहन दिले. इतिहासकारांचे म्हणणे आहे की पश्मिना शालचा इतिहास यापेक्षा पूर्वीचा आहे. मुघल राजवटीत काश्मिरी शालीची लोकप्रियता वाढली आणि काश्मीरशिवाय इतर ठिकाणीही ती शाल लोकप्रिय झाली.

पश्मिना नाव कसे पडले ?

पश्मिना हा शब्द 'पश्म' या पर्शियन शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ लोकर असा होतो. kashmertourism.com नुसार, पश्मीना लोकर काश्मीरच्या पर्वतीय शेळीच्या एका विशेष प्रजातीपासून काढली जाते, ज्याला चंगरा किंवा च्यंगरा म्हणतात.

स्थानिक लोक त्याला चेगू असेही म्हणतात. या शेळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते 12000 फूट उंचीवर आणि उणे 40 अंशांपेक्षा जास्त तापमानात हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये राहतात. विशेषत: ते काश्मीर, लडाख, नेपाळ आणि तिबेटच्या डोंगराळ भागात आढळतात. काश्मीरमध्ये या शेळ्या पाळणाऱ्या भटक्यांना चांगपा म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT