Anant-Radhika Wedding what is shubh muhurt baraat varmala timing marriage date dress code venue  
Trending News

Anant-Radhika Wedding : आली लग्न घडी समीप..! राधिका-अनंतच्या लग्नाचा मुहूर्त कितीचा आहे? जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चट आज लग्नबंधनात अडकणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशातील सर्वात श्रीमंत घरातील एका राजकुमाराचं आज लग्न पार पडत आहे. बिझनेसमन अंबानी घरातील लाडका अनंत आणि बिझनेस क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या मर्चंट घरातील राधिकाचे लग्न आज थाटामाटात पार पडणार आहे.

राधिका आणि अनंत आज सात फेरे घेऊन एकमेकांशी कायमचे लग्नबंधनात अडकणार आहेत. काही वेळाने अनंत अंबानींच्या लग्नाची वरात निघेल आणि अनंत आणि राधिकाच्या लग्नात सर्व काही खास असणार आहे. त्यांच्या लग्नात देश-विदेशातील पाहुणे, स्वादिष्ट भोजन, सुरक्षा व्यवस्था, शाही पोशाख आणि बरेच काही असणार आहे.

आज अनंतची वरात, त्यांची वरमाला, त्यांच्या लग्नाचा मुहूर्त कितीचा आहे हे आपण जाणून घेऊयात.

तसे तर अनेक पाहुण्यांना लग्नाची पत्रिका मिळाली आहे. अनेकांनी या पत्रिकेचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे अनेकांना लग्नाची पत्रिका कशी आहे हे पहायला मिळाले आहे. पण, लग्नाचा मुहूर्त कितीचा आहे हे अनेकांना माहिती नाही. उगी मुहूर्त चुकायला नको त्यामुळे आज आपण लग्नाचा मुहूर्त कितीचा आहे हे जाणून घेऊयात.

आज दुपारी ३ च्या दरम्यान वरात वराच्या दारात येईल. आणि अनंतला फेटा बांधण्याचा विधी पार पडेल

यानंतर गुजराती प्रथा मिलनी विधी पार पडेल आणि वराचे स्वागत होईल. यानंतर रात्री ८ वाजता वरमालेचा विधी पार पडेल

विवाह, सात फेरे आणि सिंदूर दान करण्याचा विधी रात्री ९.३० वाजता सुरू होईल

या विवाह सोहळ्यानंतर १३ आणि १४ जुलै रोजी रिसेप्शनही ठेवण्यात आले आहे

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह पारंपारिक वैदिक हिंदू रितीरिवाजांनुसार होणार आहे. अनंत आणि राधिका दोघेही गुजराती कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांच्या लग्नात फक्त गुजराती विधी होतील. यामुळेच अनंत राधिकाच्या लग्नाची सुरुवात मामेरू विधीने झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT