Application Sakal
Trending News

Viral : 'गोरी, सडपातळ बायको पाहिजे'; 40 वर्षाच्या पठ्ठ्याची थेट तहसीलदाराकडे पत्र लिहून मागणी

त्याच्या मागण्या ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

राजस्थान : राजस्थान, पंजाब, बिहार या राज्यामध्ये लग्नाला मुली मिळण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे तेथील तरूण काहीतरी वेगवेगळे प्रयोग करत असतात. तर एका ४० वर्षाच्या पठ्ठ्याने थेट तहसीलदाराला पत्र लिहून लग्नासाठी मुलीची मागणी केली आहे. या व्यक्तीने लिहिलेल्या पत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, महावर असं पत्र लिहिलेल्या तरूणाचं नाव असून त्याने दौसा जिल्ह्यातील बहरावंडा तालुक्यातील तहसीलदाराला पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्याने आपल्याला कशी बायको हवी आहे याविषयी लिहिलं आहे. त्याचबरोबर त्याने अटी आणि नियमसुद्धा या पत्रामध्ये लिहिल्या आहेत.

Application

या पत्रामध्ये लिहिलंय की, माझी घरची परिस्थिती प्रतिकूल असून मी लग्न होत नसल्यामुळे तणावाखाली आहे. मी घरचे काम करण्यास असमर्थ असल्यामुळे मला आता घरातील काम करण्यासाठी बायकोची आवश्यकता आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की मला बायको मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. अटी खालीलप्रमाणे

१) सडपातळ असली पाहिजे

२) गोरी असली पाहिजे

३) ३० ते ४० या वयोगटातील असली पाहिजे

४) सगळे कामं यायला पाहिजेत

या व्यक्तीने लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या पत्राला नेटकऱ्यांनी शेअर केलं आहे. हे पत्र वाचून तुम्हालाही आपलं हसू आवरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईलही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT