Bank employee apologizes after viral audio controversy involving offensive remarks against a jawan.

 

esakal

Trending News

Bank Employee woman apology audio : जवानाला अपशब्द वापरणाऱ्या 'त्या' बँक कर्मचारी महिलेने अखेर मागितली माफी; आता रडत म्हणू लागली की...

Bank Employee woman apology to jawan :जाणून घ्या, या प्रकरणात रीतसर परिपत्रक काढून एचडीएफसी बँकेने काय भूमिका घेतली आहे.

Mayur Ratnaparkhe

Bank Employee’s Apology After Using Offensive Words for Jawan : सध्या सोशल मीडियावर एका खासगी बँकेतील महिलेकडून सीआरपीएफच्या एका जवानाशी बोलताना अपशब्द वापरले गेले होते. या घटनेचा ऑडिओ व्हायरलही झाला होता. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संबंधित महिलेबाबत प्रचंड नाराजी होती. कारण, त्या महिलेने अतिशय चुकीच्या भाषेत संबंधित  जवानाला उत्तर दिली होती. परिणामी या महिलेवर तत्काळ कारवाई केली जावी, अशी मागणी जोर धऱू लागली होती, शिवाय ही महिला एचडीएफसी बँकेची कर्मचारी असल्याचे समोर आले होते. यामुळे आता या सर्व प्रकरणावर एचडीएफसी बँकेकडून एक अधिकृत निवेदन जारी करून भूमिका स्पष्ट केली गेली. 

एचडीएफसी महिलेबाबत काय म्हटलंय? -

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एचडीएफसी बँकेने यासंदर्भात म्हटले की, हे सोशल आणि ऑनलाइन मीडियावर प्रसारित झालेल्य एका ऑडिओ क्लिपसंदर्भात आहे. ज्यामध्यए एक महिला सीआरपीएफच्या जवानाशी चुकीच्या पद्धतीने बोलताना ऐकू येत आहे. अनेक पोस्टमध्ये तिला चुकीने एचडीएफसी बँकेची कर्मचारी म्हटले गेले आहे. मात्र, आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, ही व्यक्ती एचडीएफसी बँकेची कर्मचारी नाही. किल्पमध्ये ऐकू येणारे संभाषण हे आम्हाला पटलेलं नाही आणि एक संघटन म्हणून आमच्या मूल्यांनाही ते दर्शवतही  नाही.

महिलेने जवानाला नेमकं काय म्हटलं होतं? -

महिलेने जवानाविरोधात अपमानजनक टिप्पणी करत म्हटले होते की, ‘’तुम्ही अशिक्षित आहात, त्यामुळेच तुम्हाला सीमेवर पाठवलं गेलं आहे. जर तुम्ही शिक्षित असता, तर एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत काम करत असता. तुम्ही दुसऱ्या कुणाचा तरी हिस्सा नाही खाल्ला पाहीजे, तो पचणार नाही, यामुळेच तुमची मुलं अपंग जन्माला येतात.’’

एवढच नाहीतर या महिले पुढे असंही म्हटलं की, ‘’मी देखील एका सैन्य परिवारातीलच आहे. जर तुम्ही एखाद्या चांगल्या कुटुंबातून असता, तर तुम्ही १५-१६ लाखांचे कर्ज घेतले नसते. तुम्ही कर्ज घेऊन जगत आहात आणि तरीह ज्ञान पाजळत आहात. तसेच या महिलेने त्या जवनास बँकेच्या शाखेत येण्याचे आव्हानही दिले व म्हटले, जे करायचं ते करा, मला बरबाद करण्याचा प्रयत्न करा. भिकाऱ्यासारखं कर्ज घेऊन जगत आहात, आम्ही तुमच्या वडिलांचे नोकर आहोत का?’’

हा प्रकार समोर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने उघड झाला. यानंतर युजर्सनी कथितरित्या एचडीएफीसी बँकेकडे या कर्मचारीस तिच्या अपमानजनक वागणुकीसाठी बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली आहे.

अखेर महिलेने मागितील माफी –

वातावरण तापत असल्याचे लक्षात आल्यावर आणि सोशल मीडियावर युजर्स ट्रोल करू लागल्यानंतर महिलेने आता जवानाची माफी मागितली आहे. ‘’हॅलो सर, अनुराधा.. खरंतर सर मलाही नाही माहिती की हे सगळं कसं घडलं, तेव्हा मला काय राग आला होता, मला कशाचा वैताग आलेला होता, कामाचा काय ताण होता?  पण माझ्याकडून कळत न कळत चूक तर झालेली आहे.पण देशाच्या जवानांचे मन दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. माझ्या तोंडून ते शब्द निघाले आहेत, आता मला ते परतही घेता येत नाहीत. कारण, शब्द तोंडून निघाले आहेत. पण मी सॉरी नक्कीच म्हणून शकते.’’

तसेच ‘’तुम्हाला  विनंती आहे की, शक्य झाल्यास मला माफ करा. कारण, माणसाकडून चूक होते आणि माझ्याकडूनही चूक झाली आहे. घडल्या प्रकाराबाबत मला अतिशय लाजिरवाणं वाटत आहे, की मी इतके चुकीचे शब्द वापरले. खरंतर मला सैन्यदलाबाबत तसे काहीच बोलायचं नव्हतं, पण माझ्याकडून चूक झाली आहे. कृपया मला घाणरेडे मेसेज, फोन कॉल करू नका, मी सर्वांना हात जोडून विनंती करते आहे.  माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता, कृपया मला लहान बहीण समजून माफ करा. तुम्हाला काही शिक्षा करावी वाटत असेल तर सांगा, कारण आता माझ्या जॉबवरही हे आलं आहे.’’ असही संबंधित महिलेने म्हटलय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul price cut News : ‘अमूल’ने घेतला मोठा निर्णय! तब्बल ७०० पेक्षा अधिक उत्पादनांच्या किंमतीत केली घट

Dandiya Function : कोल्हापुरात नवरात्रोत्सवात रास दांडिया खेळण्यासाठी जय्यत तयारी, विविध ठिकाणी होणार कार्यक्रम; इथे उत्साह वाढवा

Motala Crime : धावत्या ट्रॅव्हल्समध्ये विवाहितेचा विनयभंग; पुण्यावरून येताना घडली घटना, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Smriti Mandhana: स्मृती मानधनाने मोडला Virat Kohli चा मोठा विक्रम! भारताच्या पुरुष क्रिकेटपटूंनाही नाही जमला असा पराक्रम केला

Latest Marathi News Live Update : माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT