A man astonishingly rides his bike from under a truck stuck in Bihar traffic, a moment that quickly went viral on social media.

 

esakal

Trending News

man riding bike under truck video : याला म्हणतात जीव द्यायची हौस! ; पठ्ठ्यानं ट्राफिकमध्ये अडकलेल्या ट्रक खाली घातली दुचाकी अन् मग ...

man riding a bike under a truck stuck in traffic video viral : जाणून घ्या, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि या बहाद्दराने या कारनाम्यानंतर नेमकं काय म्हटलंय?

Mayur Ratnaparkhe

Man Rides Bike Under Stuck Truck — Clip Spreads Rapidly Online : आजकाल कधी कोण काय कारनामा करेल काहीच नेम नाही. रस्त्यांवर तर हे प्रकार आपल्याला सर्रास दिसतात. कोणीही अगदी काही उद्योग करतं, विशेष करून गाड्यांवर, दुचाकीसह विविध कारनामे झालेले दिसता. कोणी गाडी मांडी घालून चालवत, तर कोणी गाडी एका चाकावर चालवतं, काही बहाद्दर तर गाडीवर आपल्या प्रेयसीला समोर उलट बसवून तिच्याशी रोमान्स करतही गाडी चालवतात. 

आताही एका अशाच काहीशा वेगळ्या कारनाम्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. शिवाय, त्यावर विविध कमेंटही सुरू झाल्या आहेत. हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचं समोर आलं आहे. शिवाय या व्हिडिओमधील महाशय हे केलेल्या प्रतापाबद्दल दंड थोपटून अभिमानाने आपल्या राज्याचं नाव सांगताना दिसतात.

व्हिडिओत एक व्यक्ती रस्त्यावर ट्राफिकमध्ये अडकलेल्या एका ट्रक खालून चक्क त्याची मोटारसायकल काढताना दिसतो. विशेष म्हणजे तो असं करताना गाडीखालीही उतरत नाही, गाडीवर बसूनच तो त्याची दुचाकी ट्रक खालून काढतो. तर हा कारनामा करताना अन्य एकजण त्याचा सहकारी व्हिडिओ शूट करत असतो.

दुचाकी सहीसलामत ट्रकखालून काढल्यानंतर तो स्वत: मोठं अभिमान वाटावं असं काम केल्याचं दर्शवतो आणि स्वत:लाच शाबसकी देत, ये बिहार है... असंही वरून सांगतो. तर त्याचा सहकारीही त्याला दुजोरा देतो आणि ये बिहार है हम कहीसे भी घुस जाते है असं म्हणतो नंतर ते दोघेही दुचाकीवर बसून निघून जातात.  

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर अशीही चर्चा सुरू आहे, की अखेर लोक आपल्या जीवनाला इतकं हलक्यात कसं काय घेतात. बहुतांश जणांनी तर हा व्हिडिओ पाहून कपाळाला हात मारला असणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod Crime : भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पंचवीस लाखाची रोकड घेऊन जातांना चोरट्यांनी लुटले

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

पाकिस्तानात गेलेल्या भाविकांच्या तुकडीतून महिला बेपत्ता; थेट धर्मांतर करुन लग्न केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT