bjp mps ravi kishan manoj tiwari trolled for wearing saffron gamchha amide pathaan Controversy viral photo  
Trending News

Viral Photo : आता चालतं का? भाजपच्या खासदारांचा लंगोट चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिलवसांपासून पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात भगवे कपडे घालण्यावरून बराच वाद झाला होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली होती. दरम्यान, आता भाजपच्या दोन खासदारांचा एक फोटो व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये हे दोघे खासदार दोघे भगवे कापड गुंडाळून गंगेत स्नान करताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून लोक दिल्लीचे भाजप खासदार मनोज तिवारी आणि गोरखपूरचे खासदार रवी किशन यांना चांगलेच ट्रोल करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रवी किशन आणि मनोज तिवारी हरिद्वारमधील गंगा नदीत स्नान करून बाहेर येताना दिसत आहेत. दोन्ही खासदारांनी भगवा गमछा परिधान केला आहे. या फोटोमुळे लोक त्यांना ट्रोल करत आहेत. रवी किशन यांनी स्वतःही ट्विट करून काही फोटो शेअर केले आहेत. वडिलांच्या पुण्यतिथीला गंगा मातेची पूजा करून त्यांनी महामंडलेश्वर साधू संत गणाचा आशीर्वाद घेतल्याचे त्यांनी लिहिले आहे.

दीपिकाने भगव्या रंगाची बीकिनी घातल्याने मोठा वाद झाला होता, त्यानंतर विशेक गोयल या एका ट्विटर युजरने "भगव्याला लंगोट बनवून टाकलं भैय्याजी? गजब आहे" असे म्हटले आहे.

गोविंद यादव या वापरकर्त्याने हे दोघे भगवे कापड गुंडाळून अंघोळ केली तर ठिक आहे, दीपिकाने गुंडाळलं तर खराब? असा प्रश्न केला आहे. तसेच इतर अनेक वापरकर्त्यांनी हा भगव्या रंगाचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

शाहरुख खानच्या आगामी 'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिका पदुकोणने भगवी बिकिनी घातल्याने मोठा गोंधळ झाला होता . भाजपच्या सर्व नेत्यांनीही या चित्रपटात बदल करण्याची मागणी केली होती. आता जेव्हा मनोज तिवारी आणि रवि किशन भगवा गमछा परिधान करून गंगेत स्नान करतानाचे फोटो समोर आले तेव्हा लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT