Break Up Sakal
Trending News

Heartbreak Insurance Fund : पठ्ठ्याने लढवली शक्कल! ब्रेकअप झाल्यावर मिळाले तब्बल 25 हजार रूपये

ब्रेकअप झालेल्या तरूणाने एक योजना सुरू केली होती. त्यामुळे त्याला ब्रेकअप झाल्यावर २५ हजार रूपये मिळाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आवडत्या व्यक्तीसोबत ब्रेकअप झाल्यावर अनेकजण तणावाखाली येतात, अनेकांना त्रास होत असतो पण एका तरूणाला ब्रेक अप झाल्यामुळे तब्बल २५ हजार रूपये मिळाले आहेत. त्याने रिलेशनमध्ये आल्यानंतर "हर्टब्रेक इन्शुरन्स फंड" नावाची योजना सुरू केली होती त्यामुळे त्याला हे पैसे मिळाले आहेत.

या प्रकाराची माहिती सदर तरूणाने स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. प्रतीक आर्यन असं या तरूणाचे नाव असून त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, आम्ही रिलेशनमध्ये आल्यानंतर एक "हर्टब्रेक इन्शुरन्स फंड" नावाची योजना सुरू केली होती. यामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येकी ५०० रूपये दोघांच्या जॉईन्ट अकाऊंटवर जमा करत होतो.

या प्रेमात जो धोका देईल त्याचा या अकाऊंटवरील पैशावर हक्क असेल असा नियम या योजनेचा होता. आमचे ब्रेकअप झाल्यानंतर आता मला या अकाऊंटवरील पैसे मिळाले आहेत. ही रक्कम २५ हजार रूपये इतकी असून ही योजना फक्त इमानदार लोकांसाठी असल्याचं त्याने सांगितलं आहे.

दरम्यान, त्याने पुढे लिहिताना महिलांवर टोमणासुद्धा मारला आहे. "हर्टब्रेक इन्शुरन्स फंड" या योजनेचा फायदा आपल्यालाही मिळू शकतो असं स्त्रियांना का वाटते? असा मिश्किल टोला प्रतीकने लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT