Video Viral  Sakal
Trending News

Video Viral : लग्न लागलं अन् फटाके फुटण्याऐवजी नवरीने भर मंडपात केला गोळीबार

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हटलं की सर्वांच्या आनंदाचा दिवस असतो. देशातील प्रत्येक ठिकाणी लग्नाची संकल्पना आणि पद्धत वेगळी असते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये लग्न लागल्यानंतर नवरीने भर मंडपात गोळीबार केल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

हा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील असल्याची माहिती असून हाथरस येथील एका लग्नानंतर नवरीनेच गोळीबार केला आहे. उत्तरप्रदेश आणि बिहारच्या काही भागात अशी गुन्हेगारी सतत होताना दिसत असते. तर अनेकदा तेथील गावातील पुढारीसुद्धा गोळीबार करत असतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलंच शेअर केलं असून या विवाहितेवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सदर विवाहितेवर आणि इतरांवर कारवाई केली असून गुन्हा दाखल केला आहे.

रूपा पांडे असं विवाहितेचं नाव असून तिने तिच्या चुलत्याच्या लायसन्स असलेल्या बंदूकीतून गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

मालिकेतील वडिलांनीच खऱ्या आयुष्यात केलेलं मिताली मयेकरचं कन्यादान; म्हणाले, 'मला मुलं नाहीत पण...'

Solapur Jangam Samaj : जनगणनेत 'हिंदू' म्हणूनच नोंद करणार; जंगम समाजाचा निर्धार, शिवाचार्यांविरोधी वक्तव्याचा एकमुखाने निषेध

Paithan News: यंदाच्या नालेसफाईवर विशेष लक्ष द्यावे; पैठण पालिकेकडून अपेक्षा : वरवरच्या स्वच्छतेऐवजी गाळ काढण्याची गरज

Panchgani Pinewood School: पाचगणीतील पाईनवुड इंटरनॅशनल स्कूलची मान्यता धोक्यात; शिक्षण विभागाची मोठी कारवाई, मान्यता रद्दीची शिफारस..

SCROLL FOR NEXT