Business Success Story
Business Success Story esakal
Trending News

Business Success Story : श्रीमंतांच्या स्टारबक्सचा मालक चक्क एकेकाळी रक्तदान करून पैसे जमवायचा !

सकाळ डिजिटल टीम

‘स्टारबक्स’ची प्रेरणा

Success Story of Starbucks : जेवढी प्रतिकूल, परिस्थिती कठीण, तेवढी तुमची प्रगती जास्त होते; पण जर तुम्ही तशी इच्छा केलीत, तर! हॉवर्ड शुल्ट्झ, ज्याने स्टारबक्स हा कॉफीचा ब्रँड तयार केला, आज शंभर अब्ज रुपयांचा उद्योग करणारी त्याची ही कंपनी, तिची सुरुवात खूप कष्टाने झाली आहे. हॉवर्ड अतिशय गरीब घरात जन्मला.

एका सार्वजनिक चाळीमध्ये त्यांचे कुटुंब राहत असे. हॉवर्ड आणि दोन भावंडे आपल्या आई-वडिलांचे कष्ट बघत मोठी झाली. त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर होते, तर आई मिळेल ती छोटी-मोठी कामे करत असे.

हॉवर्ड एक दिवस शाळेतून घरी आला, तर त्याने पाहिले की आपले वडील कोचवर विमनस्क अवस्थेत बसलेले आहेत. त्यांच्या मालकाने त्यांना अतिशय वाईट रीतीने वागवून कामावरून काढून टाकले होते. आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील निराशा आणि सर्व काही गमावल्याची भावना पाहून हॉवर्डला गलबलून आले.

Business Success Story

त्याच्या वडिलांच्या कामावर ना त्यांना पेन्शन होती, ना कुठली सुरक्षितता. आजारी पडणे ही सुद्धा एक मोठी शिक्षाच वाटायची. अशा परिस्थितीतही त्याच्या आईने त्याला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. तू शिकलास तर काही ना काही तरी संधी उपलब्ध होतील, आणि आपले आयुष्य मार्गी लागेल, असे तिने हॉवर्डच्या मनावर ठसवले.

हॉवर्ड शाळेत असताना उत्कृष्ट फुटबॉल-बेसबॉल खेळत असे. आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्याने ॲथलेटिक स्कॉलरशिप मिळवली. त्याला मिशिगन विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला. आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी तो बार टेंडर म्हणून काम करायचा. प्रसंगी त्याने आपले रक्त सुद्धा विकले.

बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्याने पदवी संपादन केली आणि तो नोकरी करू लागला. सुरुवातीला त्याने झेरॉक्स कंपनीत नोकरी धरली. कालांतराने त्याने एका कपडे बनवणाऱ्या कंपनीत नोकरी धरली.

कामानिमित्त फिरत असताना त्याने ‘स्टारबक्स’ हे कॉफीचे दुकान पाहिले. या दुकानात कॉफीच्या बिया आणि कॉफी तयार करण्याचे इतर सामान मिळत असे. तिथल्या वातावरणामुळे तो भारून गेला. हॉवर्ड स्टारबक्समध्ये नोकरी करू लागला.

त्याने फक्त कॉफीच्या बिया विकण्याऐवजी तयार कॉफी का विकली जाऊ नये, अशी कल्पना मांडली. परंतु अमेरिकेत कुणीही बाहेरची कॉफी पिणार नाही, असे कंपनीच्या मालकांना वाटले.

पुढे कामानिमित्त हॉवर्ड इटलीला गेलेला असताना त्याने पाहिले, की मिलान शहरात जवळजवळ पंधराशे कॉफी हाऊस आहेत.

कॉफी पिणे हे केवळ काम नसून कॉफी पिता पिता अनेक विषयांवर गप्पा मारणे, आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटणे, अशी इटालियन लोकांची संस्कृती आहे आणि हीच संस्कृती हळूहळू अमेरिकेत येऊ घातली होती.

हॉवर्डने अमेरिकेला परत आल्यानंतर तयार कॉफी बनवण्याचे दुकान काढण्याचे ठरवले. ‘स्टारबक्स’च्या मालकांनी त्याला विरोध केला. परंतु, त्याने आपल्या जोखमीवर हे दुकान सुरू केले. (Motivational Story)

अमेरिकन लोकांना या पद्धतीने कॉफी पिणे अतिशय आवडले आणि अल्पावधीतच त्याच्या पहिल्या दुकानाला अभूतपूर्व यश मिळाले. वेगवेगळ्या पद्धतीची कॉफी प्यायला, गप्पा मारायला आणि वातावरण अनुभवायला, ‘स्टारबक्स’मध्ये गर्दी होऊ लागली.

हळूहळू ‘स्टारबक्स’ची दुकाने वाढली. ‘कॉफी नव्हे प्रेरणा’ हे ब्रीद मिरवणाऱ्या ‘स्टारबक्स’ची आज संपूर्ण जगभर पंचवीस हजार दुकाने आहेत. जिथे कॉफी पिणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. स्टारबक्स हे नाव त्याच्या निर्मात्यांनी एका कादंबरीमधील पात्रावरून दिलेले आहे.

हॉवर्डने आपल्या कर्मचाऱ्यांना नेहमीच मानाने वागवले आणि त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली. (Business)

याच गोष्टीमुळे त्याला अपार यश मिळाले.

डॉ. प्रिया दंडगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT