Police officials escorting the arrested constable following the Chennai–Coimbatore train sexual assault case involving a student passenger.
esakal
Chennai Coimbatore train incident : चेन्नईहून कोइम्बतूरला जाणाऱ्या रेल्वेमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली तामिळनाडू पोलिस विभागातील एका हेड कॉन्स्टेबलला ताब्यात घेण्यात आले आहे.
कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा धावत्या रेल्वेमध्ये विनयभंग केल्याचा शेख मोहम्मद नावाच्या पोलिस कर्मचाऱ्यावर आरोप आहे. रेल्वेत तो तिच्या शेजारी बसलेला होता आणि सहप्रवासी होता. सध्या तो आरएस पुरम पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होता.
ही संपूर्ण घटना संबंधित विद्यार्थिनीने तातडीने तिच्या फोनमध्ये रेकॉर्ड केली. यानंतर रेल्वे सुरू असतानाच रेल्वे संरक्षण दलाला (आरपीएफ) याबाबत तत्काळ कळवले.
संबंधित विद्यार्थीनीने रेकॉर्ड केलेला पुराव्याचा व्हिडिओ आणि तक्रारीच्या आधारे, रेल्वे अधिकाऱ्यांनी कटपाडी जंक्शनवर थांबवले, तर काही रिपोर्टमध्ये अराक्कोनम रेल्वे स्टेशनचाही उल्लेख आहे, जिथे रेल्वे अधिकाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेतले.