Flames and smoke were seen from a China-based passenger aircraft forcing pilots to make an emergency landing — all passengers safely evacuated.
esakal
airplane caught fire China : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे. ज्यामध्य दिसत आह की, एका उडत्या विमानात आग भडकली आहे. हा व्हिडिओ चीनमधील असल्याचे समोर आले आहे. चीनच्या हांगओउ येथून सियोल येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर चायनाच्या फ्लाइट CA139मध्ये एक प्रवाशाच्या कॅरीऑन बॅगेत ठेवलेल्या लिथियमची बॅटरीने अचानक पेट घेतला. या घटनेमुळे विमानातील सर्वच प्रवासी प्रचंड घाबरले आणि मग विमानाचे शांघाय येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
प्राप्त माहितीनुसार ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सकाळची आहे. तर विमान सकाळी साधारण पावणेदहा वाजता हांगझोउ येथून रवाना झाले होते आणि दुपारी साधारण साडेबारा वाजता सियोल येथे पोहचणार होते. मात्र या प्रवासादरम्यानच विमानातील प्रवाशांच्या बॅगा ठेवण्याच्या जागेवरून अचानक आगीच्या ज्वाळा बाहेर पडून लागल्या, धूर पसरला आणि मग विमानात एकच गोंधळ उडाला. विमानातील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रय़त्न केला.
दरम्यान विमानातील काही प्रवाशांनी या भयानक घटनेचा व्हिडिओ मोबाइलवर बनवला आणि तो शेअर देखील केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विमानातील परिस्थिती आपल्याला दिसून येते. अचानक भडकलेली आग आणि धूर पाहून विमानातील महिलांनी आरडाओरड सुरू केली होती. तर प्रवासी आपल्या जागा सोडून इतरत्र जात होते. अन् या दरम्यान विमानातील कर्मचारी ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होते.
या घटनेसंदर्भात एअर चायनाकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, या घटनेत कुणालाह दुखापत झालेली नाही. विमान सुरक्षितपणे शांघाय पुडोंग विमानतळावर उतरवले गेले. यानंतर दुसऱ्या विमानाने प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पाठवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.