Viral News sakal
Trending News

Viral News : सिगारेट बाबा! सिगारेट अर्पण करताच मिळतं खरं प्रेम, वाचा अजब कहाणी

लखनऊच्या एका बाबाच्या समाधीवर तुम्ही जर सिगारेट अर्पण केली तर तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळू शकतं.

सकाळ डिजिटल टीम

कधीही आयुष्यात कोणतीही अडचण आली तर अनेकजण देवाचं दार ठोठावतात आणि प्रार्थना करतात. जर तुम्हाला आयुष्यात खरं प्रेम मिळवायचं असेल तर तुम्ही उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे जाऊ शकतात. येथे जाऊन तुम्ही जर सिगारेट अर्पण केली तर तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळू शकते.

तुम्हाला वाटेल की हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. लखनऊच्या एका बाबाच्या समाधीवर तुम्ही जर सिगारेट अर्पण केली तर तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळू शकतं. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ( cigarette baba people offer cigarette on samadhi in lucknow to get true love viral news)

प्रत्येकजण आपल्या परंपरा, धर्मानुसार इच्छा पुर्ण करण्यासाठी पुजा करतात. अनेकदा तुम्ही समाधीवर चादर अर्पण केल्याचे पाहिले असावेत पण उत्तर प्रदेशात एका समाधीवर लोक चादर नाही तर सिगारेट अर्पण करताहेत. ही समाधी वेल्स बाबाची असून या बाबांना सिगारेट बाबा म्हणून सुद्धा ओळखतात.

या बाबाच्या दरबारी दूरवरुन लोक सिगारेट अर्पण करण्यासाठी येतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात.

सिगारेट बाबा कोण आहेत?

सिगारेट बाबांना वेल्स बाबा असेही म्हणतात. कॅप्टन फ्रेडरिक वेल्स हे ख्रिश्चन धर्मीय होते जे आधी ब्रिटीश सैन्यात नोकरी करायचे. वेल्स बाबांना सिगारेट आणि दारूची प्रचंड आवड होती. वेल्स बाबा जोडप्यांच्या जीवनात आनंद-प्रेम आणतात, असा समज आहे. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी लोक त्यांच्या समाधीवर सिगारेट अर्पण करतात. अनेकांना बाबा प्रसन्न झाल्याचेही दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT