Video Viral Sakal
Trending News

Video Viral : निवडणुकीआधीच काँग्रेस नेत्याची शक्कल; गावकऱ्यांना घडवली हेलिकॉप्टरची सफर

येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मध्यप्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार असून त्याची पूर्व तयारी सर्वच नेत्यांनी सुरू केली आहे. भाजप, काँग्रेस, आप यांच्यासहीत सर्वच पक्षांनी आपापल्या रणनितीनुसार निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

मध्यप्रदेशमध्ये यावेळी आम आदमी पक्ष चांगली मुसंडी मारेल अशी अपेक्षा अनेकांना आहे. तर येथील राजगढ जिल्ह्यातील एका काँग्रेस नेत्याने निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून चक्क गावकऱ्यांना हेलिकॉप्टरची सफर घडवली आहे. या सफरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राजगड जिल्ह्यातील नरसिंगगड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेते रघु परमार यांनी आपल्या मूळ लासुदलिया जागीर गावात राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी हेलिकॉप्टर बोलावून त्यांना हेलिकॉप्टरची सफर घडवली.

सोमवारी ग्रामस्थांना हेलिकॉप्टरमध्ये बसवून एकूण 15 फेऱ्या करण्यात आल्या असून सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरच्या फेऱ्या बंद करण्यात आला होता, त्यानंतर मंगळवारी पुन्हा या फेऱ्या सुरू करण्यात आल्या.

काँग्रेस नेते परमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, माझ्या गावात सर्व मागासवर्गीय राहतात, ज्यांनी आयुष्यात हेलिकॉप्टरमध्ये बसतानाही पाहिलं नव्हतं, माझ्या गावातील लोकांसाठी काहीतरी करण्याची मला सुरुवातीपासून इच्छा होती, म्हणूनच गावकऱ्यांसाठी हेलिकॉप्टर बोलावून मी त्यांना हेलिकॉप्टरची सफर घडवली.

तर ही निवडणुकीची तयारी नसून समाजकार्य असल्याचंही त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं आहे. पण निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी हा स्टंट केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

SCROLL FOR NEXT