Corporate harassment case: A female employee accuses her boss  esakal
Trending News

Workplace Harassment : महिला कर्मचारीने नकार देताच, तिचा युरोपियन बॉस संतापला अन् मग...!

Female employee harassment in corporate office: जाणून घ्या, पीडित महिलेने नेमकं काय सांगितलं आहे, सोशल मीडियावर याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Mayur Ratnaparkhe

Harassment Case in Corporate Office: आजकाल समाज कितीजरी पुढे गेला असला तरी महिलांची प्रश्न मात्र कायमच आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या सुरक्षितेबाबत निर्माण होणार प्रश्न, ज्यांना महिलांना समाजात वावरताना जवळपास प्रत्येक ठिकाणी सामोरे जावे लागते. विशेषकरून कॉर्पोरेट क्लचरमध्ये महिलांच्या समस्या वेगळ्याच असतात. त्यांना धड त्या कुणाला सांगताही येत नाहीत आणि सहनही होत नाहीत.

खरंतर महिलांच्या सुरक्षिततेसाठी POSH सारखे अनेक कठोर नियम बनलेले आहेत. परंतु एखाद्या महिलेला जर तिच्य बॉसकडूनच त्रास दिला जात असेल तर, मात्र ती अक्षरशा हतबल झालेली दिसते. असाच काहीसा प्रकार एका महिलेबोबत घडला आहे आणि तिने आपली ‘आपबीती’ Redditवर शेअर केली.

 अशाच एका Redditवरील पोस्टमध्ये एका महिलेने आपली व्यथा मांडली आहे, तिने आरोप केला आहे की, ती वैवाहिक असूनही तिला तिच्या बॉसने अप्रत्यक्षरित्या प्रपोज केलं. मात्र जेव्हा महिलेने नकार दिला तेव्हा त्या बॉसने चक्क तिचा पगारच रोखले, शिवाय प्रत्येक लहान कामात तो लक्ष देवून हस्तक्षे करू लागला.

पीडित महिलेचे म्हणणे आङे की, तिचा युरोपियन मॅनेजर, जो तिचा बॉस आहे. त्याने या वर्षीच्या सुरुवातीसच फोनवर आपल्या मनातील गोष्ट सांगतिली होती. परंतु महिला कर्मचीराने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता, तेव्हापासून तिच्या बॉसच्या वागणुकीत विचित्र झाल्याचे बदल दिसून आले.

महिला कर्मचारीने आपल्या पोस्टमध्ये असेही सागंतिले की, ती जेव्हा तिच्या सहकाऱ्यांशी बोलते तेव्हा तिच्या बॉसचा जळफळाट होतो, भलेही तो तसंह काही दाखवत नाही. परंतु जेव्हा मी काम संपवलेलं असतं त्यानंतर तो विचार असतो की, तू ठीक आहेस ना?

याशिवाय त्या महिलेने असेही सांगितले आहे की, तिच्या बॉसने आता तिचा पगार देण्यासही जाणूनबुजून उशीर करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय, इतरांच्या तुलनेत तिला कामही जास्त करायला सांगितले जात आहे. महिला कर्मचारीने असं म्हटलं आहे की, कदाचित बॉस त्याची नाराजी अशाप्रकारे व्यक्त करत आहे. तर आता ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट करायला सुरुवात केली आहे. काहींनी तर तिला हा जॉब तत्काळ सोडण्याचाही सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला वरुण राजाचा आशीर्वाद; भर पावसात ढोल ताशा पथकाकडून वादन

Golden Kalash : लाल किल्ल्यातून 1 कोटींचा सोने-हिऱ्यांनी जडलेला कलश चोरीला; घटना सीसीटीव्हीत कैद, जैन समाजाच्या कार्यक्रमात प्रकार

मानाच्या गणपतीच्या आरतीवरून वाद, ठाकरेंच्या नेत्याकडून शिंदेंच्या मंत्र्याचा पानउतारा, मग सत्कारात मागे ठेवून लागलीच घेतला बदला

काय नवरा एक्सचेंज ऑफर सुरुये? 'घरोघरी मातीच्या चुली'चा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले; म्हणतात- हिला सगळ्या भावांशी लग्न करायचंय...

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

SCROLL FOR NEXT