Viral Video Sakal
Trending News

Viral : अंगातली मस्ती नडली! पठ्ठ्या मगरीच्या नादी लागला अन्...; थरारक Video

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मगर किंवा साप पाहिली की आपल्या पायाखालची जमीन सरकते. अनेकदा मगर माणसांना खाऊन घेत असते. पण काहीजण अशा आक्रमक प्राण्यांच्या नादी लागतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक व्यक्ती मगरीच्या हल्ल्यात जखमी झाल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मगरीला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत असून पहिल्यांदा तो मगरीच्या तोंडावर पाय देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तो मगरीच्या तोंडावर वार करण्याचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात मगर त्याच्या हाताला पकडते आणि जोराचा चावा घेते यामध्ये त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. अशा प्रकारे या तरूणाला आपल्या अंगातील मस्ती नडली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT