Rahul Gandhi_Tshirt 
Trending News

Rahul Gandhi T-Shirt: राहुल गांधींना थंडी का वाजत नाही? टीशर्ट आला ट्रेंडिंगमध्ये!

राहुल गांधीकडे पाहून नेटकऱ्यांना असे प्रश्न का पडलेत आणि त्यांच्या टीशर्टवर ते चर्चा का करत आहेत, जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi TShirt Trend : भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी महात्मा गांधींच्या स्मारकाला भेट दिली. तसेच माजी पंतप्रधानांच्या स्मृतीस्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या. विशेष म्हणजे दिल्लीत सध्या प्रचंड थंडी असतानाही राहुल गांधींनी केवळ टीशर्टचं परिधान केलं होतं. (Delhi cold wave Rahul Gandhi TShirt in trending)

दिल्लीत लाल किल्ला परिसरात सभेदरम्यान बोलतानाही राहुल गांधींनी आपल्याला पत्रकार विचारतात की तुम्हाला थंडी का वाजत नाही, असं सांगितलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी उत्तर देताना म्हटलं होतं की, तुम्ही शेतकऱ्यांना आणि मजुरांना असा प्रश्न विचाराल का?

दरम्यान, या घडामोडींनंतर दिल्लीतील सध्याचं ९ डिग्री तापमान आणि राहुल गांधींचं टीशर्ट ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आला आहे. कारण कडाक्याच्या थंडीतही कोणतेही गरमीचे कपडे न घालता केवळ एका टीशर्टवर राहुल गांधी दिसत आहे. पण यामागचं कारणंही त्यांनी सांगितल आहे की, ज्या लोकांना कपडेही घालायला मिळत नाहीत त्यांच्यासाठी आपण केवळ टीशर्टचं घालत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ट्विटरवर अनेकांनी राहुल गांधींच्या एनर्जीचं आणि फिटनेसचं कारण काय असं विचारलं आहे? तर दुसऱ्या एकानं म्हटलं की, राहुल गांधींना पंतप्रधान बनवा कारण ते थंडीतही केवळ टीशर्टच घालून फिरत आहेत. एका एकानं त्यांना खोचक टोला लगावताना खरोखऱच पैशांमध्ये खूपच उब असते असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT