Viral News esakal
Trending News

Viral News : पैसे भरण्याच्या ठिकाणी लिहिली जन्मरास, हा माणूस एकदम खास!

सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही व्हिडिओ आणि फोटो हे नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.

युगंधर ताजणे

Deposit Money Person Write Birth Sign viral social media : सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही व्हिडिओ आणि फोटो हे नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. काहीवेळेला त्यातून नेटकऱ्यांना वेगळी काही माहिती मिळते किंवा त्यातून त्यांचे निखळ मनोरंजनही होते. काही फोटो मात्र खूपच वेगळ्या प्रकारे नेटकऱ्यांना, वाचकांना सजग करताना दिसतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोनं मात्र अनेकांना आपलं हसू आवरलेलं नाही. एका पठ्ठयानं बँकेच्या पैसे भरण्याच्या स्लिपवर चक्क जन्म रास लिहून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बँकेच्या पैसे भरण्याच्या स्लिपवर किती पैसे भरणार आहेत असे विचारले जाते. त्याला हिंदीमध्ये राशी असे म्हणतात. मात्र एकानं त्याठिकाणी आपली जन्मरास लिहून आपली बुद्धीमत्ता दाखवून दिली आहे. त्याच्या या अचाट पराक्रमाचे अनेकांनी कौतूकही केले आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

राशी च्या कॉलममध्ये त्यानं जन्मरास लिहून त्यानं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पडले आहे. काहींना तो फोटो पाहून हसू आवरलेलं नाही. अशावेळी सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, कोण म्हणतं भारतामध्ये टॅलेंटची कमी आहे म्हणून, असे फोटो पाहिल्यानंतर आपल्याला आणखी किती हूशार माणसं हवी आहेत असा प्रश्न पडतो. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, यावर काय बोलावे हेच मला कळेना.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो भलेही एका वर्षांपूर्वीचा असून मात्र आता पुन्हा एकदा समोर आला आहे. @NationFirst78 नावाच्या युझर्सनं तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. खातेदारानं पैसे भरताना कशाप्रकारे पैसे भरण्याच्या ठिकाणी जन्मरास लिहिली आहे हे त्या फोटोतून पाहायला मिळते. त्यानं ज्याठिकाणी जन्मरास लिहिली आहे त्याठिकाणी पैशांचा आकडा लिहिणं अपेक्षित आहे.

आपण तुळ राशीचे आहोत असे त्या व्यक्तीनं लिहिलं आहे. काही जणांना तो फोटो पाहून हसू आवरलेलं नाही. आतापर्यत त्या फोटोला मिळालेल्या लाईक्स आणि कमेंटसची संख्याही मोठी आहे. यापूर्वी देखील अशाप्रकारचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

आनंदाची बातमी! पुण्यात १३ लाखांत मिळणार घर, म्हाडाकडून ४४६२ घरांसाठी लॉटरी जाहीर

Pune Crime: विमा योजना संपली, पैसे मिळणार सांगून गंडा; वाघोलीतील व्यक्तीला ४० लाखांचा ऑनलाइन चुना

Ujani Water: उजनीचे पाणी वाया, बोराळे नंदूरचे तलाव कोरडे! शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संताप, कार्यालयात ठिय्या

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

SCROLL FOR NEXT