Bharat Jodo Yatra Digvijay Singh esakal
Trending News

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत धक्काबुक्की; चेंगराचेंगरीत दिग्विजय सिंह जमिनीवर कोसळले

राहुल गांधींची पदयात्रा आज ओंकारेश्वर ते इंदूरकडं निघाली असताना चहापानाच्या वेळी धक्काबुक्की झाली.

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधींची पदयात्रा आज ओंकारेश्वर ते इंदूरकडं निघाली असताना चहापानाच्या वेळी धक्काबुक्की झाली.

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) दौऱ्यात आहेत. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पदयात्रेचा आज चौथा दिवस आहे. यानंतर राहुल गांधी आपल्या टीमसह राजस्थानमध्ये दाखल होणार असून, तिथं अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची भेट घेणार आहेत.

राहुल गांधींची पदयात्रा आज ओंकारेश्वर ते इंदूरकडं निघाली असताना चहापानाच्या वेळी धक्काबुक्की झाली. यादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह खाली जमिनीवर कोसळले. त्यानंतर तिथं उपस्थित समर्थक आणि सुरक्षा दलांनी त्यांना मदतीचा हात देवून जमिनीवरुन वरती उठवलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांना गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांची तब्येत बरी असल्याचं दिसून येत असून ते प्रवासाला पुढं जात आहेत. दिग्विजय सिंह देखील आज राहुल गांधींसोबत पायी चालताना दिसत आहेत. बरवाहपासून चार किमी अंतरावर चोर बावडीजवळ एका हॉटेलमध्ये राहुल गांधी अचानक चहासाठी थांबले. त्यावेळी तिथं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळं दिग्विजय सिंह जमिनीवर कोसळले. या प्रकारानंतर दिग्विजय सिंह यांनी नाराजी व्यक्त केली.

आज राहुल गांधींची ही यात्रा खरगोन जिल्ह्यातील मनिहार, बलवाडा मार्गे महूला पोहोचेल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकाला राहुल गांधी भेट देणार आहेत. यानंतर ते एका सभेला संबोधितही करतील. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह देशातील आणि राज्यातील सुमारे 40 नेते उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : करमाडमध्ये टोमॅटो दरावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT