Divorce Party Viral  esakal
Trending News

Divorce Party Viral : ‘जोर का झटका..’; तलाकनंतर मित्रांना दिली divorce पार्टी, डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Pakistani Women Organized Divorce Party : आजवर आपण लग्न सोहळा वाजत गाजत केलेला पाहिला आहे. पण, घटस्फोटाची पार्टी केल्याचे तुम्ही कधीच पाहिले नसेल. घटस्फोट होणे म्हणजे दुख:द गोष्ट मानली जाते. पण, या महिलेने मात्र ही गोष्ट एन्जॉय केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Divorce Party Viral :

‘आजकाल अनेक किरकोळ गोष्टींसाठी पार्टी केली जाते. गाडी घेतली, बर्थडे झाला किंवा एखाद्याने नवा फोन घेतला तरी पार्टी केली जाते. पण, एका पाकिस्तानी महिलेने चक्क घटस्फोटाची पार्टी केली आहे.

आजवर आपण लग्न सोहळा वाजत गाजत केलेला पाहिला आहे. पण, घटस्फोटाची पार्टी केल्याचे तुम्ही कधीच पाहिले नसेल. घटस्फोट होणे म्हणजे दुख:द गोष्ट मानली जाते. पण, या महिलेने मात्र ही गोष्ट एन्जॉय केली आहे.

जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांमधील एक असतं लग्न. पण, सध्या लग्न जुळणं कमी अन् मोडण्याचे प्रमाण जास्त वाढलं आहे. सध्या एका तरूणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात तिने घटस्फोटाच्या पार्टीत डान्स केला आहे.  सोशल मिडियावर या डान्सचा व्हिडिओ व्हारयल झाला आहे. (Pakistani Women Organized Divorce Party)

हा व्हिडिओ अमेरिकेतील असून ही महिला पाकिस्तानची आहे. या महिलेचा घटस्फोट झाला होता. आणि त्यानंतर तिने या घटस्फोटाचे जोरदार सेलिब्रेशन सुद्धा केले आहे. मित्रांना पार्टी देऊन त्या पार्टीत महिलेने कल्ला केला आहे. या महिलेच्या मागे ‘डिवॉर्स मुबारक’ असे लिहीले आहे.

या महिलेचा डान्स करतानाचा एक मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या एका मिनिटात ती चार गाण्यांवर मनसोक्त नाचली आहे. शीला की जवानी, सोना कितना सोना है, पैसा–पैसा आणि जोर का झटका या पार्टी सॉग्सवर ही महिला थिरकली आहे. 

घटस्फोट घेतलेली महिला किंवा पुरूष असा गाजावाजा करत नाहीत. पण, या महिलेने केलेल्या डान्सच कौतुक तिच्या मित्रमंडळींनीही केलं आहे. या महिलेच्या पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी तिला प्रोत्साहन दिले आहे.

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. काहींनी या महिलेला शुभेच्छा दिल्या आहेत. तर, काहींनी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: सासरेबुआ, तुमच्या मुलीचे तीन प्रियकर, तिला समजावून सांगा! जावयाची विनंती; पण सासऱ्यानं उलट उत्तर दिलं अन्...; नको ते घडलं

किती गोड! दीपिकानंतर 'ठरलं तर मग'मधील अस्मिताने दाखवला लेकीचा चेहरा; म्हणते, 'दिवाळी पाडव्याला आम्ही...'

Government Officer : संघाच्या पथसंचलनात सहभागी झालेल्या आणखी एका सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई; वैद्यकीय अधिकाऱ्याला केलं निलंबित

Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरजची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल पदावर नियुक्ती, Video

"त्याने मला विचित्र पद्धतीने स्पर्श केला" पारुने सांगितला तिला आलेला वाईट अनुभव "सहन करायचं नाही मारायचं.."

SCROLL FOR NEXT