Fatehpur UP DM Indumati esakal
Trending News

Viral Video: "बदमाश कुठला, ढकलून पुढे जातोय..."; जिल्हाधीकारी इंदुमतींनी एका व्यक्तीला मारली चापट

Fatehpur UP DM Indumati's Shocking Behavior: सध्या जिल्हाधिकारी इंदुमती जिल्हा मुख्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत सतत औचक निरीक्षण करत आहेत. सोमवारी त्यांनी मुख्यालयाच्या सब रजिस्ट्रार ऑफिसचे निरीक्षण केले.

Sandip Kapde

उत्तर प्रदेशातील फतेहपुर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सी. इंदुमती यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या कार्यालयाच्या निरीक्षणादरम्यान एका बाहेरील व्यक्तीला चापट मारताना दिसत आहेत. या व्यक्तीने जिल्हाधीकाऱ्याने धक्का देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी संतापल्या आणि त्यांनी त्या व्यक्तीला ताबडतोब थप्पड मारली. एवढेच नव्हे तर, त्यांनी त्या व्यक्तीला चांगलेच फटकारले.

व्हिडिओ व्हायरल-

४६ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सी. इंदुमतींचा संताप स्पष्टपणे दिसून येतो. त्यांनी धक्का देणाऱ्या व्यक्तीला सुनावले की, "मी उभी आहे, तुझं डोकं खराब आहे का? एक महिला उभी आहे आणि तू धक्का देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेस. बदमाश कुठला. कोण आहेस तू? कशासाठी आला आहेस?"

व्हिडिओ थांबवण्याचा प्रयत्न-

यावेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ काढला आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, जिल्हाधीकाऱ्यांच्या सहकाऱ्यांनी व्हिडिओ काढणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. या घटनेदरम्यान इंदुमती खूपच संतापलेल्या दिसल्या.

निरीक्षणाचे परिणाम-

सध्या जिल्हाधिकारी इंदुमती जिल्हा मुख्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत सतत औचक निरीक्षण करत आहेत. सोमवारी त्यांनी मुख्यालयाच्या सब रजिस्ट्रार ऑफिसचे निरीक्षण केले. जेव्हा जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये निरीक्षणासाठी पोहोचल्या, तेव्हा एक बाहेरील व्यक्ती त्यांच्या जवळून धक्का देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी इंदुमतींनी तातडीने पलटून त्या व्यक्तीला थप्पड मारली.

घटनास्थळावरील स्थिती-

व्हिडिओमध्ये दिसते की, फतेहपुरच्या जिल्हाधिकारी ऑफिसचे निरीक्षण करत आहेत आणि अधिकारी/ कर्मचाऱ्यांना काही सूचना देत आहेत. अचानक त्यांच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांना धक्का दिला. यावर त्या भडकल्या आणि लगेच त्या व्यक्तीला थप्पड मारली. तसेच त्याला चांगलेच फटकारले. घाबरून तो व्यक्ती दूर हटला. हे पाहून तिथे उपस्थित अन्य लोक घाबरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT