CCTV Camera Sakal
Trending News

Viral Video : चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; थरारक घटना CCTV Camera मध्ये कैद

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : तीन वर्षाच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवल्याची घटना नागपूर येथे घडली आहे. त्याची आई आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर मनपा प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये चार वर्षाच्या मुलाला तीन ते चार भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्याच प्रकारची घटना नागपूरमध्ये घडली आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अशा घटना घडत असल्याची माहिती तज्ज्ञांनी सांगितली आहे.

अधिक माहितीनुसार, डुग्गू दुबे असं हल्ला झालेल्या मुलाचे नाव आहे. नागपूर येथील वाठोडा परिसरात ही घटना घडली असून तब्बल दहा कुत्र्यांनी डुग्गू याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी त्याला चावा घेऊन खेचून नेण्याचा प्रयत्न केला पण स्थानिकांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला आहे. ही घटना दुसऱ्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT