Dog Viral Video esakal
Trending News

Dog Viral Video : भक्तीरसात तल्लीन कुत्रा! कुत्र्याचा घंटानाद ऐकून तुम्हालाही वाटेल कौतुक

हिंदू संस्कृतीत मंदिरातल्या घंटानादाला फार महत्व आहे. घंटेचा तो पवित्र नाद प्रत्येकालाच भक्तीरसाचा आनंद देतो.

सकाळ डिजिटल टीम

Dog Ringing Bell Viral Video : हिंदू संस्कृतीत मंदिरातल्या घंटानादाला फार महत्व आहे. घंटेचा तो पवित्र नाद प्रत्येकालाच भक्तीरसाचा आनंद देतो. त्यात तल्लीन झालेले अनेक भक्तगण तुम्ही बघितले असतील. पण यात तल्लीन श्वानाला तुम्ही पाहिले आहात का?

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात घंटानादात तल्लीन झालेला एक कुत्रा आपल्याला दिसत आहे. पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओज व्हायरल होत असतात. त्यांचे कर्तब बघून बऱ्याचदा माणसाने काहीतरी शिकावं असा बोध दिला जातो. संगीत माणसांबरोबर प्राण्यांनापण फार प्रिय असतं असं आपण पूर्वापार ऐकत आलो आहोत आणि त्याचंच उदाहरण हा व्हिडीओ आहे.

यात कुत्रा स्वतःच मंदिरातल्या घंटाची दोरी तोंडात धरून घंटा वाजवत आहे. तो घंटा वाजवताना एवढा तल्लीन झाला आहे की त्यात तो उड्या मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ बघणाऱ्या आणि करणाऱ्या सर्वांनाच त्याचं कौतुक वाटत आहे.

व्हिडीओला मोठ्याप्रमाणात लाइक्स आणि शेअर्स मिळत आहेत. आजवर हा व्हिडीओ लाखो लोकांनी बघितला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT